पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 ३ रा. ] अध्याय ७ वा. दाशरथी तुला शापमुक्त करण्याकरितां आला आहे. हा दीनांचा स्वामी, जगताचा- उद्धार करणारा, पतितांनां पवित्र करणारा, शत्रुरूपी हत्तीनां सिंहरूप, असा हा श्रीराम आहे. " असें विश्वामित्राचें भाषण ऐकून अहिल्येला ज्ञान झाले. पुढे ब्रहागिरीवरून विश्वामित्र, राम, लक्ष्मण व अहिल्या सिद्धाश्रमी परतु विश्वामित्राने अहिल्येला गौतमाचे स्वाधीन केलें. श्री इदमणानी गौतमाला नमस्कार केला, अहिल्येला मोठा आनंन साला. देवांनीं पुष्पवृष्टी केली. नगारे. चाजूं लागले. तीन्हीं लोकीं रामकथा गाऊं लागले. अध्याय ७ वा. १ मरुतांची कथा. 66 66 वैशंपायन ऋषि राजा जनमेजयाला अहिल्येची कथा सांगून पुन्हा रामाची कथा सांगू लागले. “ विश्वामित्र ऋषि पुढे व मागें राम लक्ष्मण चालले असतां रामानें विश्वामित्राला विचारिलें किं, हे ऋषे ! या सिद्धाश्रमाला घोरवन असे नाव प्राप्त होण्याचे कारण काय झालें तें सांगा. " तेव्हां विश्वामित्र ह्मणाला; पूर्वी देवदैत्यांनी समुद्र मंथन केल्यावर परस्परांमध्यें युद्ध होऊन देवांनीं दैत्यांनां जिंकिलें. तेव्हां दितीला वाईट वाटून ती कश्यपाला ह्मणाली, "देवांना जिंकील असा पुत्र मला द्यावा. " तेव्हां कश्यपानें देवांनां जिंकणारा पुत्र तुला होईल असा वर दिला. पुढे दितीला गर्भ राहिला असतां, एक दिवस चुकून दिती दक्षिणेस पाय, उत्तरेस शिर व आकाशाकडे मुख करून निजली. ती संधी साधून इंद्रानें सूक्ष्म रूप धारण करून दितीच्या योनिमार्गाने तिच्या उदरांत प्रवेश केला आणि त्या गर्भाचे सात तुकडे केले; त्यावेळी तो गर्भ आक्रोश करूं लागला. त्यावेळी इंद्र म्हणाला मा रुत रडूं नको; तरी तो रडावयाचा राहीना म्हणून आणखी त्या प्रत्येकाचे सात याप्रमाणे एकूणपन्नास तुकडे केले. तरी तो गर्भ रडावयाचा राहीना. इतक्यांत दिती जागी झाली, व इंद्र बाहेर आला, तो दितीने त्यास ओळखिलें, व शाप देणार इतक्यांत इंद्र म्हणाला किं, " मी वज्राने याचे एकूणपन्नास तुकडे केले आहेत याकरितां हे एकूणपन्नास मरुद्रण होतील, व वायव्य दिशेचे अधिपति होतील. " याप्रमाणे सांगून इंद्र आपल्या स्थानीं निघून गेला. इंद्रानें हैं घोराचरण या सिद्धाश्रमांत केले म्हणून यास घोरवन म्हणूं लागले. २ त्रिशंकूची कथा. पुढे विश्वामित्र रामलक्ष्मणांसह मिथिला नगरीला आले. त्यावेळी जनकराजा आपल्या कुलगुरु शतानंदाला घेऊन विश्वामित्राला सामोरा आला. सर्वांच्या यथायोग्य भेटी झाल्यानंतर शतानंद विश्वामित्राची कीर्ति जनकाला सांगू लागला.