पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ [ स्तनक 66 भ्रष्टु आहे, असें असतां आपण हे काय हाणतां ?" त्यावेळी तो कुटिल गौतमरूपी इंद्र हाणाला; तुझ्या विरहानीनें व कामज्वरानें हा देह व्यापून गेला आहे, याकरितां धर्मशास्त्राच्या गोष्टी सांगत बसलीस तर हा देह मुळींच राहणार नाहीं " याप्रमाणे अनेक प्रयत्नांनीं अहिल्या इंद्रानें भोगिली. इंद्राचा व अहिल्येचा रतिवि- लास पुरा होत आहे तोँच गौतम आश्रमांत आला. त्यावेळी त्यानें तो अहिल्येचा बी- भत्स प्रकार पाहिला व आपले स्वरूप धारण करणाऱ्या इंद्राला ओळखून त्याला शाप दिला कीं, तूं माझें स्वरूप धारण करून ब्राह्मण स्त्री भोगिलीस यामुळे तुझा नृपणगोल भूमीवर पडेल आणि तूं निर्फळ होशील. व अहिल्येला शाप दिला कीं, तूं सहस्र वर्षे शिला होशील, परंतु इंद्राने तुला फसवून केलें, ह्मणून असा उःशाप देतों कीं, ज्या वेळी तुला श्रीरामाच्या चरणाचा स्पर्श होईल त्यावेळी तूं शापमुक्त होशील." याप्रमाणे शाप दिल्यावर अहिल्या सिद्धा- श्रमांत शिळा झाली आणि त्यावेळेपासून त्या आश्रमाला घोरवन असें हाणूं लागले. असे वाल्मीकि रामायणांत आहे. इंद्राला शाप झाल्यानंतर त्याने ती सर्व हकी- कत देवांना सांगितली. त्यावेळी सर्व देवांनीं गौतमाची प्रार्थना केल्यावर गौतमानें उःशाप दिला कीं, " मेंढ्याचा वृषण इंद्राला लाविला असतां त्याची विटंबना दूर होईल." त्यावेळीं अमि, ब्राह्मण व देव या सर्वांनी मेंढ्याचा वृषण आणून इंद्राला लावितांच त्याची विटंबना दूर झाली, व तेव्हांपासून इंद्राला मेपवृषेण असें ह्मणूं लागले, व अजूनहि इंद्राला यज्ञांमध्यें मेषवृपणाची आहुती देतात. ब्रह्मपुराणांत अशी कथा आहे किं, ब्रह्मगिरीवर शिला हो- शील, असा गौतमानें अहिल्येला शाप दिला. व गौतमानें इंद्र मांजराच्या रूपाने पाहिला आणि त्याला शाप दिला किं, तुझ्या शरीरावर शंभर भगें उत्पन्न होतील, असा शाप दिल्याबरोबर त्याच्या सर्वोगावर भगें उत्पन्न झाली. तेव्हां इंद्राने ती हकीकत देवांनां सांगितली, त्यावेळी देव इंद्राला घेऊन गौतमाजवळ आले व गौतमाची प्रार्थना करून हाणाले; "हा देवांचा राजा इंद्र आहे, याकरितां त्याच्यावर कृपाकरून याला शापमुक्त करावें." त्यावेळी गौतम ह्मणाला ब्राह्मणाचा शाप असत्य होणार नाहीं, परंतु मी असा उःशाप देतों कीं, याच्या भगाच्या जागी नेत्र होतील. तेव्हां सर्व देव व इंद्र आपल्या स्थानीं गेले व गौतम सिद्धाश्रमी राहिला. पुढे एक हजार वर्षांनी श्रीरामचंद्र व विश्वामित्र बरोबर जात असतां वाटेत ती महाशिला पाहून विश्वामित्राला फार आनंद झाला व ह्मणाला; " हे श्रीरामा ! या शिलेला तूं पाय लाव. " त्यावेळी श्रीरा- पाने गुरुवचनावर विश्वास ठेऊन त्या शिलेला चरण लाविला. त्याबरोबर शिलेपासून दिव्य स्वरूप धारण करणारी सुंदर अहिल्या उत्पन्न झाली. माझा 66 पूर्वीप्रमाणेच हा कोणीतरी तोतिया असेल असे तिला वाटून भीति गली. त्यावेळी विश्वामित्रानें सांगितले किं, हे मातोश्री ! हा श्रीराम कथाकल्पतरु.