पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ६ वा. पीन तिचे उत्तम रीतीनें पालन केले. पुढे ती कन्या पूर्ण तारुण्याच्याभरांत आल्यावर गौतमऋषि तिला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला, व तिला ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. तारुण्यभरांत आलेली आपली कन्या अहिल्या गौतमानें परत आणून दिलेली पाहून ब्रह्मदेव, आश्रर्ययुक्त होऊन हाणाला; " हे गौतमा ! तूं इंद्रियांनां जिंकणारा, महातपस्वी ऋषि आहेस, तुला उपमा देण्याला दुसरा कोणी नाही. " अहिल्या रूपाने व गुणांनी पार्वती समान आहे असें ऐकून इंद्र, अमि, यम, निरृति, वरुण, वायु, सोम, सूर्य, ईशान, वगैरे सर्व देव आपआपल्या वाहनावर बसून अहिल्येकरितां ब्रह्मदेवाजवळ आले, व कन्येची मागणी करू लागले. तेव्हां ब्रह्मदेव ह्मणाला; " जो अगोदर पृथ्वीप्रदक्षिणा करून येईल त्याला मी अहिल्या देईन." तेव्हां सर्व देव आपआपल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरितां निघाले; व गौतमऋषिहि पृथ्वीप्रदक्षिणा करण्याकरितां निघाला, परंतु आपणाजवळ वाह्न नसल्यामुळे आपल्या हातून पृथ्वीप्रदक्षिणा कशी होणार या विवंचनेंत तो होता, इतक्यांत पुढें वीणारी गाय त्याच्या दृष्टीस पडली. बाहेर दोन खूर व मुख आले आहे असे पाहून त्या उभयतोमुखी गाईला डाव्या- बाजूनें व उजव्याबाजूनें अशा तीन प्रदक्षिणा केल्या. ह्या तीन प्रदक्षिणा शंकराच्या शतपूजांच्या बरोबर आहेत आणि ते शिवलिंगाचें एक पूजन पृथ्वीप्रदक्षिणे- समान आहे. याप्रमाणें गौतम ऋषि पृथ्वीप्रदक्षिणाकरून ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवानें याला पृथ्वीप्रदक्षिणेचें पुण्य घडलें आहे असें जाणून आपली अहिल्या- कन्या त्यास दिली. दुसरे दिवशीं इंद्र पृथ्वी प्रदक्षिणा करून आला आणि पाहतो तो गौतम अहिल्येला वरून बसला आहे. असे पाहून इंद्राला राग आला व तो ब्रह्मदेवाला ह्मणाला; जर तूं गौतमाला वर निश्चित केला होतास तर आह्मां देवांनां पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा विनाकारण त्रास कां दिला ?" तेव्हां ब्रह्मदेव हाणाला; माझी वाणी कधींही असत्य बोलत नाहीं. गौतमाला पृथ्वीप्रदक्षिणा घडली हाणून ही कन्या त्याला दिली. नाहीं तर तुझां देवांनां सोडून मनुष्याला कां दिली असती ?' ते ऐकून इंद्र दुःखोद्गारानें ह्मणाला, हे रत्न भिक्षुकाला मिळाले, परंतु मी व्यभिचारानें हिला छळीन, असे हाणून देवांसहित इंद्र निघून गेला. पुढे गौतमऋपि गृहस्थाश्रम करून सिद्धाश्रमी राहूं लागला. कांही दिवस लोटल्यावर, गौतम एके दिवशी अहिल्येला घरामध्ये ठेवून समिधा आणण्याकरितां वनामध्ये गेला होता ती संधी साधून इंद्र गौतमाचें रूप धारण करून अहिल्येच्या आश्रमांत आला. आणि अहल्या जलपात्र घेऊन बाहेर येतांच त्याने तिचा हात धरून ' मी मदनाधीन झालो आहे मला रतिदान दे हाणून सांगितले. त्यावेळी अहल्या ह्मणाली; "आतां सूर्यनारायण ि आहे, अद्यापि अस्ताचलाला गेला नाहीं, तुझी जानी अहांत, आपणाला सूट माहीत आहेत, आपण सतीचे धर्म जाणतां, दिवा मैथुनाचा धर्मशास्त्रात ३३