पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक 66 हैं वैशंपायनऋपांचें बोलणें ऐकून जनमेजय म्हणाला, “मला है खरे वाटत नाहीं; कारण प्रयागाच्या पुढे यमुना मुळींच दिसत नाहीं. " तेव्हां वैशंपायन म्हणाले, राजा तुझी शंका योग्य आहे. प्रयागापुढे यमुना न दिसण्याचें कारण असें आहे की, पूर्वी भगीरथराजानें महान् प्रयत्न करून गंगा प्रयागाला आणिली, त्या वेळी गंगेनें पुढें काळीभोर महान् यमुना कहिल्याचरोचर, मी हिच्यापुढे, सूर्यापुढे जसा 66 - काजवा - तशी आहें असें जाणून, गंगा पाताळांत जाऊं लागली. तेव्हां देवांनी यमुनेची प्रार्थना करून सांगितले की, भगीरथराजानें महान् प्रयत्न करून लोकांवर उपकार करण्याकरितां गंगेला पृथ्वीवर आणिलें आहे, करितां तूं भागी- रथीमध्ये मिळून जा. " त्यावेळी यमुना म्हणाली; “हे गंगे ! तूं संपूर्ण चराचरामध्यें पवित्र आहेस, वाकरितां हे गंगे! मी तुझ्या उदरांतून शंभर योजनेंपर्यंत राहीन, व व तेथपर्यंत तुला मी मातेसमान मानीन, परंतु सागराला मिळण्याचे वेळी मी निराळी होईन. " त्यावेळी भागीरथीनें तिचे म्हणणे कबूल करून ती वर निघाली व यमुनाही तिच्यामध्ये मिळून निघाली. याप्रमाणे त्या पवित्र दोन्ही नद्या शंभर योजनें जाऊन नंतरराळ्या झाल्या. भागीरथी सहस्त्र मुखांनी पूर्वसमुद्राला मिळाली, व यमुना उदयाचलाला गेली. जनमेजय म्हणाला, " हे ऋषिवर्य | भागीरथी पूर्व- समुद्राला मिळाल्यावर यमुना निराळी गेलेली दिसत नाहीं. " तेव्हां वैशंपायन म्हणाले; “ राजा ! ज्याप्रमाणें ब्रह्मगिरीच्या पाठारावर सोन्याच्या खाणी आहेत, अर्से पुराणांत आहे, परंतु त्या दिव्यचक्षूंशिवाय दिसत नाहीत, जसें एकरूप झालेले उदक आणि दूध, हंसपक्ष्याशिवाय दुसऱ्याला निराळें करितां येत नाही, त्याप्रमाणें सूर्याच्या किरणांनी नेलेलें यमुनेचे उदक सामान्य मनुष्याला दिसणे अशक्य आहे." "याप्रमाणें यमुनेची कथा पद्मपुराणांत प्रयागमाहात्म्यांत आहे. 66 ३. अहिल्येची कथा. 6 याप्रमाणें यमुनेची कथा सांगितल्यावर जनमेजय राजाला वैशंपायन ऋषि पुढे श्रीरामचंद्राची कथा सांगू लागले. श्रीरामचंद्र विश्वामित्राच्या यज्ञसंरक्षणाकरितां जात असतां श्रीरामाने आपल्या चरणस्पर्शाने पतीच्या शापवचनानें शिक्षा झालेली- खी अर्ध्या क्षणांत उद्धरिली तेव्हां जन्मेजय म्हणाला, “ती स्त्री शिळा कां झाली ? ती कोणाची मुलगी ? तिचा पति कोण १ व तो तिच्यावर को रागावला १ ती कथा सांगा. " तेव्हां वैशंपायन म्हणाले, हिमालयाजवळ सिद्धाश्रम या नावाचें महातपोवन आहे, तेथें गौतमऋषि रहात होते. त्या ठिकाणी ब्रह्मदेव आपली कन्या अहिल्या हिला बरोबर घेऊन आला; आणि म्हणाला, "अहो वेदमूर्ति । ही माझी लाडकी लहान मुलगी आहे, हिचें तूं उत्तमरीतीनें पालन करावें, व तुझ्या मानानें ही प्रौढ झाली म्हणजे तूं मला परत आणून द्यावीस. " याप्रमाणे सांगून, मुलीला गौतमाजवळ ठेऊन ब्रह्मदेव निघून गेला. गौतमऋ 61