पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या ३१ ३ रा. ] शाप देणारी तुझी खरी आई नसाची आला; व तिजवर क्रुद्ध होऊन म्हणा सुवर्णा म्हणाली, "हे सूर्या! मी 66 ' असें म्हणून सूर्य सुवर्णेकडे सगेखर कोण आहेस ते सांग. " छाया आहे; अर्थात् मी तिचीच अंशभूत असल्यामुळे मीहि तुझी अर्धागी हयांत माझा कोणताच अपराध नाहीं." मग सूर्य शनीला म्हणाला, शनि: दीपेण तुझी आईच आहे, तेव्हां हिचा शाप बाधल्यावांचून तुला राहणार नसूर्याने असे सांगितल्यावर शनीचे पाय किंचित् वांकडे झाले. अध्या २. यमुनेची कथा. सुवर्णेनें तो एकंदर प्रकार सूर्याला सांगितल्यावर संज्ञा पृथ्वीवर गेल्याचें सम- जलें. मग त्यानें अंतरदृष्टीने पाहिले, तेव्हा त्याच्या अर्से लक्ष्यांत आले की, संज्ञा घोडीचे रूप धारण करून तपश्चर्या करीत आहे. मग सूर्यानेही घोड्याचं रूप धारण केलं; व त्या स्थितीत तो संज्ञेजवळ येऊन कामचेष्टा करूं लागला. त्या वेळी संज्ञा ऋतुस्नात असल्यामुळे, ती गरोदर झालीय एवं तिला अश्विनीदेव या नांवाचे दोन मुलगे झाले. तेच पुढे स्वर्गलोकांत प्रसिद्ध वैद्य झाले; नंतर कांहीं दिवस गेल्या- चर त्या संज्ञेला वैवस्वत मनु या नावाचा आणखी एक मुलगा. नंतर संज्ञा व सूर्य दोघेही पृथ्वीवरून उदयाचलाशी गेले; तेथें यमुना खेळत होती. आपल्या आई- बापांना एकदम आलेले पाहून तिला फार आनंद झाला व तिने आपल्या मोठमोठ्या लहरीनी आनंद प्रदर्शित केला. तीच हीं यमुना नदी होय. ह्या महानदीचा उगम अस्ताचळापासून झाला, अशी कथा पद्मपुराणातील प्रयागमहात्म्यांत आहे. ही यमुना पाताळांत कुर्माच्या पृष्ठावर व पृथ्वीच्या पोटात वाहणारी होऊन पुढे अष्ट दिशांना व्यापून पश्चिम समुद्राला भिडून निघाली, तें कलिंद पर्वताला में सभजलें, तेव्हां तो मार्गात आडवा आला, व पळमात्र त्यानें तिला अडवून धरिलें, त्यावेळी यमुना कलिंदपर्वताला भोक पाडून बाहेर पडली, व बाहूं लागली. कलिंदपर्वताला भोंक पाडून निघाल्यामुळे यमुनेला कालिंदी हें नांव प्राप्त झालें, व तो डोंगर काजळाचा होता त्याचा भेद करून यमुना निघाली म्हणून तिचे पाणी काळे झाले. पुढे ती पूर्वदिशेकडे सात समुद्रांचा भेद करून उदयाचळाला गेली. तेथेंही तिचा वेग कमी होईना, तेव्हां सूर्याने तिला आकाश- मार्गानें नेलें व तेथे तिला पश्चिमवाहिनी केली. तिच्या पाण्याचे ओघ रेषा. 'रूपाने दिसतात. ही यमुना नदी गंगा, गोदावरी, कृष्णा, यांच्या पूर्वीची आहे. याप्रमाणें ही यमुना पृथ्वीवर अस्ताचलापासून उदयाचलापर्यंत व आकाशमार्गाने उदयाचलापासून अस्ताचलापर्यंत, अशी माळेतील मण्याप्रमाणे फिरत आहे, "