पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० कथाकल्पतरु. [ स्तबक ' म्हणतात, रामचंद्रा | याप्रमाणें ही गंगा भगीरथराजाने आणली आहे. " हीच कथा संक्षेपरूपार्ने दुसन्या स्तबकांत सांगितली आहे. अध्याय ६ वा. १ यमुनानदीची उत्पत्ति. भागौरथीची कथा ऐल्यावर श्रीरामचंद्राला व लक्ष्मणाला, यमुनेचौही कथा ऐकण्याची इच्छा झाली. श्रीरामचंद्र विश्वामित्र ऋषीला म्हणाले, " हे ऋषिवर्य ! यमुना पृथ्वीवर कशी आली, तें ऐकण्याची माझी इच्छा आहे. " तेव्हां विश्वामित्र- ऋषि मार्ग क्रमित असतां यमुनेची कथा सांगू लागले. ते म्हणाले, " रामचंद्रा | त्वंचू या नावाचा एक प्रजापती होता, त्या प्रजापतीला संज्ञा या नांवाची एक अत्यंत रूपवती कन्या होती, ती त्यानें सूर्याला दिली. त्या उभयतांपासून यम व शनि असे दोन पुत्र झाले. या दोन पुत्रांनंतर संज्ञेला यमुना या नांवाची एक मुलगी झाली. तिघांचें जन्म अस्तमानाचे वेळीं झाले. याप्रमाणें संतति झाल्यावर सूर्याची स्त्री सज्ञा अत्यंत त्रस्त होऊन गेली. तिला सूर्याचें तेज मुळींच सहन होत नसे. मोठ्या कष्टानें तिनें सूर्याशी सहवास जोडून घेऊन तीन मुलांना जन्म दिला होता. मग तिनें आपल्या छायेपासून एक आपल्यासारखी सुंदर स्त्री निर्माण केली; व तिचें नांव सुवर्णा असें ठेवून तिला सूर्याची स्त्री या नात्यानें सूर्याच्या घरांतील सर्व व्यवहार पाहण्यास सांगितले. आणि कदाचित् प्रसंग माल्यास घडलेली सर्व हकीकत सांग, अतें त्या सुवर्णेला सांगून संज्ञा आपल्या बापाचे घरीं गेली; परंतु सूर्य रागावेल या भीतीनें त्यानें संज्ञेला आपल्या घरांत आश्रय दिला नाही, तेव्हां ती अरण्यांत गेली; व तेथे घोडीचें रूप धारण करून तपश्चर्या करूं लागली. संज्ञा गेल्यावर स्वर्णेला सूर्यापासून सावर्णिमनु, व्यति- पात, भद्रा, वैधृती, कुलीक, अर्धयाम, अशी मुले झाली. याप्रमाणें सुवर्णा सूर्याचा संसार चालवीत होती, परंतु सूर्याला त्यांत कांहींच उणें दिसून मार्ले नाहीं. पुढें एके दिवशीं, प्रातःकाळी शनीला भूक लागली; म्हणून तो आपल्या आईकडे जाऊन खाण्यास मागूं लागला तेव्हां सुवर्णा म्हणाली, 'देवांना नैवेद्य समर्पण केल्यावांचून खाण्यास मिळणार नाही. आईचें हें बोलणे ऐकून शनीला राग आला, व तो तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून येऊं लागला, तेव्हां सुवर्णेनें शनीला शाप दिला किं, तुझे पायभंग पावतील. " तो आईचा शाप ऐकून शनीला पार वाईट वाटलें, व तो सूर्याकडे येऊन त्याने झालेली सर्व हकीकत सूर्याला सांगितली. ते ऐकून सूर्याला फार आश्चर्य वाटलें. तो म्हणाला, मुलांनी कितीही मयंकर अपराध केला, तरी आई त्याला कधीही अशामकारचा शाप देणार नाहीं. यावरून तुला 66 ( 66