पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ रा ] अध्याय ५ वा. २९ घोडा नाहींसा झाल्याची हकीगत सांगू लागले, तेव्हा सगराने त्यांना ब्रह्मदेवाकडे घोड्याचा शोध करण्यास पाठविले. त्याप्रमाणें ते सर्व सत्यलोकी ब्रह्मदेवाकडे गेले; व ब्रह्मदेवाला त्यांनीं घोड्यासंबंधानें विचारिलें; ब्रह्मदेवानें अंतर्दृष्टीनें घोड्या- विषयीं सर्व वर्तमान जाणून तें त्या सगररांजाच्या मुलांना सांगितलें, तेव्हां ते सगर सत्यलोकाहून निघून पाताळांत जाण्याचा मार्ग शोधूं लागले, परंतु मार्ग न सांपडल्यामुळे त्या सगरांनी पृथ्वी खणून पाताळांत प्रवेश केला. पृथ्वी खणल्या मुळे पृथ्वीवर सर्वत्र पाणी होऊन गेलें. तो एवढा जलसंचय सगरांनी आणला; म्हणून त्या जलसंचयास सागर असें म्हणतात, ते सगर पाताळांत जाऊन पाहतात तो चाही दिशांना चार हत्ती उभे असून त्यांनी आपल्या थंडावर पृथ्वी तोलून धरली आहे. पूर्व दिशेला सुमोन, दक्षिणेला महापद्म पश्चिमेला विरुपाक्ष आणि उत्तर दिशेला हिमपांडुर उभा होता. त्या चार हत्तींना वंदन करून सगर- सुत कपिल ऋषीच्या आश्रमांत घोड्याचा शोध करण्यासाठी आले. पृथ्वीवर जेव्हां फार पाप होतें, तेव्हां त्या हत्तींना वसुंधरेचा भार असा होतो व त्यामुळे ते आपल्या शुंडा हालवितात, व मोठमोठ्यानें किंकाळ्या फोडून गर्जना करितात. पृथ्वीवर धरणीकंप होऊन भूमीत जो मोठा गडगडाट होतो, त्याचें कारण हेंच होय. असो. सगरसुतांनी कपिलमुनीच्या आश्रमांत घोडा पाहिल्यावर त्यांना मोठा आनंद झाला व त्यांनी उन्मत्तपणे कपिलमुनीचा वाटेल तसा अपमान केला, तेव्हां कपिलमुनीनें क्रोधदृष्टीने त्या सगरसुतांकडे पाहिल्या- बरोबर ते जळूं लागले. इकडे बरेच दिवसपर्यंत घोडाही परत येत नाहीं; व सगरसुतही परत येत नाहीत, असे पाहून सगरराजानें आपल्या असिमान नातवाला त्यांच्या शोधाकरितां पाठविलें. तो शोध करीत करीत पाताळांत आला. तेथें सगर जळत आहेत, असें पाहून तो शोकाकुल झाला; आणि अग्नि शांत करण्यासाठी तो पाणी शोधूं लागला, परंतु पाणी कोटेंही मिळेना. इतक्यांत त्याला गरुड भेटला व तो त्याला म्हणाला, “ असिमान ! या पितृगणावर जर गंगोदक घालशील तर यांचा उद्धार होईल. " तेव्हां गंगेच्या प्राप्तीसाठी असिमानाने तीस सहस्त्र वर्षे व त्याच्या मागून दिलीपराजानें तेरा वर्षे मरण येईपर्यंत तपश्चर्या केली, परंतु गंगेची प्राप्ति झाली नाहीं. ती तिचो प्राप्ति दिलीप राजाचा पुत्र भगरिथ याला पांच हजार वर्षे तप केल्यावर झाली. शंकरानें भगीरथ राजाला एक जटा दिली होती. त्या जटेच्या सात नद्या निर्माण झाल्या. नलिनी, पावनी, हादिनी ह्या पूर्वेस गेल्या, अलकनंदा, सुभद्रका व सुचक्षुण या पश्चिमेकडे गेल्या; आणि गंगा उत्तरे- कडे गेली. ती भगीरथ राजानें आणली; म्हणून तिला भागीरथी असेंही a