पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ कथाकल्पतरू. [ स्तबक ऐकिल्यावर श्रीरामचंद्रास गंगेची कथा ऐकण्याची इच्छा झाली; म्हणून त्यांनी ती कथा सांगण्याविषयीं विश्व मित्राची प्रार्थना केली. तेव्हा विश्वामित्र म्हणाले; "रामा ! मेरुपर्वताची मेनिका नांवाची मुलगी हिमालय पर्वताला दिली आहे. त्या मेनिकेला हिमालयापासून, गंगा व पार्वती अशा दोन मुली झाल्या; पैकी पार्वती ही महादेवास दिली असून गंगेला देवांनीं पवित्रपणासाठी पृथ्वीवरून स्वर्गात नेले. तेथें तिचें नांव ब्रह्मदेवानें मंदाकिनी असें ठेविलें. आतां ती स्वर्गीतून परत पृथ्वीवर कशी आली, ते तुला सांगतो. पूर्वी सूर्यवंशांस पराक्रमी व पुण्यशील, असा सगर नांवाचा राजा होऊन गेला; त्या राजाला सर्व कांहीं अनुकुलता होती, परंतु पुत्र नसल्यामुळे तो अत्यंत कष्टी होता. त्या सगर राजाला एक वैदर्भ देशाच्या राजाची मुलगी के- शिनी आणि दुसरी कश्यप ऋषीची कन्या सुमती, या नांवाच्या दोन स्त्रिया होत्या. त्या दोन्ही स्त्रियांना घेऊन तो सगर राजा हिमालयपर्वतावर जाऊन पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करीत बसला. कांहीं दिवसांनी त्याच्या तपश्चर्येनें भृगुऋषि प्रसन्न होऊन म्हणाले; " हे सगर राजा ! तुला साठ हजार पुत्र होतील. " असें वरप्रदान मिळा- ल्यावर तो सगरराजा आपल्या राजधानीस परत आला. नंतर त्या राजाची स्त्री सुमती काही दिवसांनी प्रसूत होऊन तिला एक तुंबीफला ( भोपळ्या ) एवढे अंडे झालें; त्या अंड्यामध्यें साठहजार घरे असून त्या लहान लहान घरांत सूक्ष्म मुलें होती. काही दिवसपर्यंत त्या अंड्याचें योग्यप्रकारे संरक्षण केल्यावर तें फुटून त्यांतून साठहजार मुलें बाहेर पडली. नंतर कांही दिवसांनी त्या सुमतीला सुरसा या नांवाची मुलगी झाली. त्याप्रमाणें केशिनीला असमंज या नावाचा एक मुलगा झाला. त्या असमंजाला असीमान ( अंशुमान ) या नावाचा मुलगा झाला. अशा रीतीनें त्या सगर राजाचा संसार वाढला, परंतु दुर्दैवाने त्याचे साठहजार पुत्र क्षणात नाहीसे होऊन नातु असीमान तेवढा कायम राहिला. तो प्रकार असा:- ते साठसहस्र पुत्र तरुण झाल्यावर एकमेकाच्या बळानें अत्यंत उन्मत्त झाले; व सर्व पृथ्वी जिंकण्याचा त्यांनी विचार करून अश्वमेधास आरंभ केला. श्यामकर्ण अश्व पृथ्वीवर सोडला व त्याच्या संरक्षणासाठी ते त्याच्या मार्गे हिंडू लागले. तेव् सगरांचा अश्वमेध पुरा झाल्यास हे फार प्रबळ होतील; व आपणास त्रास देतील, अशी भीति इंद्राला वाटल्यामुळे इंद्रानें तो घोडा त्या साठसहस्त्र सगरांची नजर चुकवून पाताळांत नेला; व कपीलमुनीचे आश्रमांत जाऊन ते ध्यानस्थ बसले असता त्यां च्या एका बाजूला नेऊन बांधला. असा प्रकार करून केंद्र अमरावतीस निघून गेला. इकडे घोडा नाहींसा झालेला पाहून सर्वांना मोठें आश्चर्य वाटलें; व ते चोहोंकडे घोड्याचा शोध करूं लागले. अनेक अरण्यें, गिरिकंदरें त्यांनी धुंडाळली, परंतु त्यांना घोड़ा कोठंही सांपडेना. तेव्हा ते परत बापाकडे आले