पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. १२ [स्तक कालाची वाट पहात बसली होती, पण इतक्यांत तिच्या दुर्दैवानें एक निराळाच प्रसंग ओढवून आला. ५ प्रभावतीचा बंदिवास. प्रभावती जसजशी उपवर होत होती तसतशी वज्रनाभाची तिच्या विवाहा- विषयींची काळजी वाढत चालली होती. तिला चांगला पति मिळावा अशी त्याची फार इच्छा होती व तेवढ्यासाठी तिचें स्वयंवर करावें असें त्याला चारंवार वाटत असे, परंतु जो मुलीचा पति, तोच आपला वैरी होऊन आपला नाश करील, अशी त्याची कांहीं कारणामुळे भावना झाली असल्या कारणानें त्यास मुलीचा विवाह करण्यास धैर्य होईना. इकडे मुलगी तर एकेक दिव- सानें वाढत जाऊन अगदीं उपवर झाली. अशा स्थितीत त्याला तो मुलीचा उपवरपणा शल्लयाप्रमाणे त्रास देत होता. मुलगी अगदीच उपवर झाली आहे, तेव्हां ती आपल्या यौवन स्वभावाप्रमाणे आपल्या अनुमोदनाची वाट न पाहतां कोणा पुरुषाबरोबर विवाह करील; अशी वज्रनाभ राजाला मीति वाटू लागली. राज्यसत्तेच्या महत्वाकांक्षेमुळे वज्रनाभाला त्या मुलीची फार भीति वाटू लागली व ती भीति त्यास एक क्षणभरहि चैन म्हणून पडूं देईना. शेवटी त्या दुष्ट वज्रनाभानें आपली एकुलती एक प्रिय कन्या प्रभावती, हिला महत्वाकांक्षेच्या भरी पडून तुरुंगांत ठेविलें. त्या तुरूंगांत त्यानें प्रभावतीचा असा बंदोबस्त ठेविला होता की, तिला तेथें पुरुषाचें दर्शनहि होऊं नये, अशी व्यवस्था केल्यावर वज्रनाभाला कांहीसे बरे वाटू लागले व त्याची भीति थोडी दूर झाली. अध्याय ३ रा. १ प्रमावतीची व हंसिणीची कथा, श्रीकृष्ण व देवेंद्र यांची भेट. देवेंद्र आणि वज्रनाभ या दोघांच्या वादाचा निकाल कश्यपाचा यज्ञ संप- ल्यावर होणार होता, हे मागील अध्यायांत सांगितले आहे. यज्ञ होईपर्यंत दोघांनां जरी अवकास मिळाला होता, तरी पुढे कसे करावयाचे हा प्रश्न दोघा पुढेंहि होताच. विशेषतः इंद्राला या संबंधाने जास्त काळजी लागली होती. कश्यप दोघांचा पिता खरा, पण त्याचें यज्ञमार्गाकडे विशेष लक्ष असल्यामुळे तो आपल्या मुल्यांच्या या वादाकडे चांगले लक्ष पुरवील असे इंद्रास वाटेना. शिवाय कश्यप जे कांही सांगेल तें वज्रनाभ ऐकेलच अशीहि कांहीं त्यास खात्री वाटेना. अशा स्थितींत कोणाचा आश्रय मागावा हा इंद्राला मोठा विचार पडला होता. विचार