पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ५ वा. तुझा स्वीकार करीत नाहीं, असे सांगितले. तेव्हां वायूस फार राग आला व त्याने त्या सर्वांना कुरूप केले, त्या वायूच्या शापामुळे त्यानें शरीर थरथर कापूं लागलें, व त्या अत्यंत विद्रूप दिसूं लागल्या. मग त्या बागेतून नगरांत परत आल्या, व त्यांनी झालेली सर्व हकीकत बापाला सांगितली. कुशनाभाला, ती हकीकत ऐकून व त्या विद्रूप मुली पाहून फार वाईट वाटलें, परंतु झालेल्या गोष्टीस कांहीं उपाय नाहीं, अर्से जाणून तो स्वस्थ बसला. 66 इकडे चूली या नावाचा एक तपस्वी तप करीत बसला होता. त्याच्याकडे सोमदा या नावाची एक गंधर्वाची स्त्री आली; व तिनें त्या मुनीची सेवाशुश्रूषा करून त्याला प्रसन्न करून घेतलें. तो तपस्वी प्रसन्न झाल्यावर सोमदा त्याला म्हणाली; मुने ! आपणापासून मला एक पुत्र व्हावा अशी इच्छा आहे, तर तेवढ्यापुरता माझा स्वीकार करून मला भोगदान द्यावें. " मुनीनें ती तिची विनंति मान्य केली; व तिला संभोगसुख दिले. त्या सोमदा गंधर्विणीला पुढे एक पुत्र झाला, त्याचें नांव तिनें तो ब्राह्मणापासून झाला, म्हणून ब्रह्मदत्त असें ठेविलें. तो ब्रह्मदत्तही ब्रह्मचीज असल्यामुळे चुली मुनीप्रमाणेच महा तपस्वी झाला. तो बह्मदत्त एके दिवशीं कुशनाभ राजाकडे आला व त्याला तुझ्या शंभर मुली मला दे, म्हणून म्हणाला. मुली विद्रूप झाल्यामुळे त्या मुलींचा कोणीही स्वीकार करीना, यामुळे कुशनाभ राजा मोठ्या काळजीत पडला होता; अशा प्रसंगी ब्रह्मदत्तानें त्या सर्व कन्यांची मागणी केल्यामुळे राजाला मोठा आनंद झाला, व त्याने मोठ्या समारं- मानें त्या मुली ब्रह्मदत्ताला अर्पण केल्या. ब्रह्मदत्ताने आपल्या मंत्रशक्तीनें त्या सर्वं मुलींना पूर्वीप्रमाणें सुंदर व तरूण केलें, व त्यासहवर्तमान तो आनंदाने राहूं ला गला. त्या कन्या वायूच्या शापानें विद्रुप ( कुब्जा ) झाल्या म्हणून या नगराला कान्यकुब्ज असें नांव पडले. पुढे त्या मुली शापमुक्त होऊन सुस्वरूप झाल्या तरी या नगराचें कान्यकुब्ज हे नांव कायम राहिले आहे. तें नगर कुशनाभानें आपल्या गाधिपुत्राला दिलें, व आपण तपश्चर्येला निघून गेला. तोच गाधिराजा माझा पिता होय. त्या गाधीनें संपूर्ण मगधदेश जिंकून आपलें एकछत्री राज्य चालविलें होतें. २ साठ हजार मुलांची गोष्ट. कान्यकुब्ज नगरास एक रात्र मुक्काम करून दुसरे दिवशीं गंगेत स्नानादिक किया करून सर्व ऋषि, विश्वामित्र, राम व लक्ष्मण असे पुढे मार्ग क्रमूं लागले. कांही रस्ता चालल्यावर कौशिकी नावाची नदी लागली, तेव्हां विश्वामित्र रामाला म्हणाले:–" रामा ! ही कौशिकी नदी माझी बहीण आहे. गाधि राजाला सत्यवती या नांवाची एक मुलगी होती, ती मुलगी माझ्या पित्यानें ऋचिक ऋषीला दिली होती; जमदमी हा तिचाच पुत्र होय. मरण पावल्यावर तिची ही नदी झाली आहे. " ती माझी बहीण सत्यवती कौशिकीविषयींची ही कथा