पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक चांगल्या रीतीने मिळाली." मग विश्वामित्राने सहा दिवसांत आपला यज्ञ मोठ्या समारंभानें पुरा केला. सर्व ऋषींना भोजनदक्षिणा वगैरे दिल्यावर त्यानें राम- लक्ष्मणांसहि दिव्य वस्त्रे व अलंकार दिले. सर्वांना प्रेमानें निरोप दिला, व विश्वा- मित्रऋषि आपणाबरोबर रामलक्ष्मणांस घेऊन अयोध्येस येण्यास निघाला " अध्याय ५ वा. १ कुशनाभाच्या शंभर मुली. 66 वैशंपायनऋषि जनमेजयाला म्हणाले, - हे राजा ! विश्वामित्रऋषि, रामलक्ष्मणांस वरोबर घेऊन निघाला असतां; तेथें जनकराजाचा दूत आला व त्यानें जान- कीच्या स्वयंवराची आमंत्रणपत्रिका विश्वामित्राला दिली, तेव्हां विश्वामित्रांनी . सर्व ऋषींना जनकराजाचा स्वयंवरसमारंभ पाहण्यासाठी बोलावणें आलें आहे, तर आतां आपण सर्वजण मिथिला नगरीस जाऊं, आणि तेथून मग ज्यानें त्यानें आपल्या आश्रमाला जावें." असे सांगून, विश्वामित्र अयोध्येचा रस्ता सोडून सर्व ऋषींसमवेत मिथिला नगरीला जाण्यासाठी निघाले. ते श्रीरामचंद्राला म्हणाले, 'रामचंद्रा ! तुम्हीं दोघेही आम्हांबरोबर मिथिलेस स्वयंवर पाहण्यासाठी चला; आणि मग तेथून मी तुम्हांला अयोध्येस पोहोंचतें करीन. जनकराजाजवळ त्र्यंबक या नांवांचें एक फार मोठें धनुष्य आहे, ते धनुष्य जो उचलील त्याला जनकराजा आपली मुलगी देणार आहे; तेव्हां तूंच तें धनुष्य उचलून जानकी मिळीव." या- प्रमाणें बोलत बोलत सर्व ऋषींसमवेत, हिमालयपर्वताला उजवी घालून मिश्यामित्र- ऋषि गंगेच्या उत्तर तीराला आले. विश्वामित्र म्हणाले, “रामा ! येथें पूर्वी कुंश या नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याला विदर्भजा, या नावाची स्त्री होती, त्या स्त्रियेपासून त्या राजाला चार पुत्र झाले. त्यांची नावें, कुशांब, कुशनाभ, अमूर्तरजस, व वस्तु हीं होत. कुशांचानें कौशांबीपुरी वसविली, कुशनाभानें महो- दय नगरी वसविली; परंतु या महोदय नगरीचें नांव कान्यकुब्जपट्टण असेंच जें पूर्वीपासून चालू आहे, तें अद्यापपावेतों तसेंच आहे." त्या कान्यकुब्ज नगरास आल्यावर श्रीरामचंद्र विश्वामित्राला म्हणाले, " ऋषे ! या नगराला कान्यकुब्ज अर्से नाव को पडलें तें मला सांगा." तेव्हा विश्वामित्रऋषि म्हणाले, 66 रामा ! कुशनाभ, या नावाचा जो राजऋषि होऊन गेला, त्या कुशनाभाला शंभर मुली होत्या. त्या मुली आपल्या तारुण्यावस्थेत एका बार्गेत खेळण्यासाठी गेल्या असता, तेथें मलयगिर्रावर राहणारा वायु ब्राह्मणाचे रूप धरून तेथें आला व त्या कन्यांना तुम्ही माझा स्वीकार करा, असें म्हणाला; परंतु त्या मुलींनी बापाच्या अनुमती वांचून विवाह करणें हें अनुचित होय; असे जाणून त्या वायूला त्यांनी आम्ही कथाकल्पतरु.