पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.] अध्याय ४ था. मोहाख, घाताख, पतनास्त्र, सोरात्र, धैर्यास्त्र, निद्राख, दिव्यास्त्राचे दोन भाते, उदकात्र, पर्वतात्र, पर्जन्यास्त्र, राक्षशास्त्र, नारायणास्त्र, शोषणास्त्र, मदनास्त्र, वाय्वत्र, प्रशमनास्त्र, चतुरंग सैन्य जिंकण्याची विद्या, महावीर घिद्या, वगैरे अनेक विद्या विश्वामित्रांनीं रामाला दिल्या. त्या विद्यांची कांही प्रचीति पहावी, म्हणून रामानी महावीर मंत्राचा उपयोग केला; 'त्याबरोबर पर्वताप्रमाणे शंभर महावीर रामचंद्रापुढें येऊन उभे राहिले; व काय आज्ञा आहे, असे म्हणाले. तो प्रकार पाहून, श्रीरामचंद्राला फार आश्चर्य वाटलें. मग श्रीरामचंद्र म्हणाले, “मी जेव्हा जेव्हां तुम्हांला बोलावीन; तेव्हां तेव्हां तुम्हीं येऊन मी सांगेन तें कार्य करावें, असें सांगितल्यावर ते महावीर रामचंद्राला वंदन करून निघून गेले. 17 पुढे मार्ग कमीत कमीत हे तिघेही सिद्धाश्रमाजवळ आले. तेथे असलेले मनोहर अरण्य, त्या अरण्याच्या काठानें वाहणारी विपुलवारियक्तं नदी, सुंदर पशु, लहान लहान रम्य अशीं सरोवरें, वगैरे पाहून रामलक्ष्मणांस अत्यंत आनंद झाला. राम विश्वामित्राला म्हणाला, “ ऋषे! हे अरण्य अत्यंत मनोहर दिसत आहे; तेव्हां याविषयींची माहिती आपणाकडून ऐकावी अशी इच्छा आहे." विश्वामित्र म्हणाले, रामा ! या आश्रमाला सिद्धाश्रम असे म्हणतात. विरोचनाचा मुलगा बळी यानें येथें यज्ञ केला होता; आणि याच ठिकाणी परमेश्वरानें वामन अवतार धारण करून बळीला पाताळांत घातलें, व देवांना त्यांची अमरावती परत दिली, तेव्हापासून या स्थळाला सिद्धाश्रम असें म्हणतात. ' मग रामचंद्र म्हणाले, “ ऋषि ! तर ही 66 जागा यज्ञयागाला मोठी चांगली आहे असे मला वाटतें. आपली कांहीं हरकत नसल्यास आपणही आपला याग येथेंच करावा.” विश्वामित्रालाही ती गोष्ट मानवली, व त्यानें यज्ञाची सामग्री गोळा करून यज्ञकुंर्डे तयार केलीं, व अनेक ऋषींना बोलावून यज्ञास आरंभ केला. होमहवनास आरंभ झाल्यावर विश्वामित्र रामाला म्हणाले, रामा ! आतां ते दुष्ट राक्षस आकाशमार्गाने येऊन येथें रक्त, मांस, हाडे वगैरे अमंगल पदार्थ टाकतील; तर सावध राहून त्यांचा नाश कर." त्याप्रमाणें रामलक्ष्मण दोघेही आपआपली धनुष्यें सज्ज करून, राक्षसांची टेहळणी करूं लागले; ते दुष्ट राक्षस आकाशांत दिसूं लागले, ते यज्ञमंडपाचे वर येण्यापूर्वीच रामानें एका बाणानें मारीच राक्षस वरच्यावर मारला, व दुसऱ्या बाणानें सुधाहूला मारलें. [रामायणांत अशी कथा आहे की, रामानें एक बाणाने मारींचास चारशें बोजनें लांब उडविलें]. तेव्हां त्या दोघांचें सेन्य रामलक्ष्मणविर धावून आले, परंतु रामलक्ष्मणानी क्षणार्धात त्या सर्व सैन्याचा नाश करून टाकला. याप्रमाणें त्या संकटायें निवारण त्या दोघांनी केल्यावर सर्व ऋषींना आनंद झाला. विश्वामित्रं म्हणाले, " रामा । तुला जी मी शस्त्रास्त्रविद्या शिकविली, त्याची गुरुदक्षिणां मला