पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू, [] [स्तबक स्तीला वाटेत आडवी होऊन आपल्या विक्राळ स्वरूपानें मीति दाखवूं लागली, तो यक्षिणीचा मूर्खपणा पाहून आगस्ती ऋषीला फार राग आला व त्याने तिला शाप दिला किं, तूं मृत्युलोकीं राक्षसीण होशील. त्या शापाप्रमाणें ती हल्लीं या अरण्यांत राक्षसीण होऊन राहिली आहे. आपण आतां या अरण्यांत प्रवेश केल्यावर ती आपल्या अंगावर धांवून येईल; त्या वेळीं तूं आपल्या बाणानें तिचा संहार कर. ती स्त्री आहे, तेव्हां तिचा नाश कसा करावा, ही शंका तूं मनांत मुळींच आणूं नकोस, जर स्त्री दुष्ट आचरणाची असेल तर तिचा वध केला असतां कांही दोष न लागता उलट पुण्यच जोडलें जातें पूर्वी मंथरा या नांवाची अशीच एक दुष्ट राक्षसीण होती, तिचा इंद्रानें नाश केला, त्याप्रमाणे तूंहि या ताटिकेचा नाश कर." विश्वामित्रानें असे सांगितल्यावर तिघांनी त्या अरण्यांत प्रवेश केला व ते मार्ग क्रमूं लागले. अरण्यांत मनुष्याचा संचार झाला, अर्से पाहून त्या ताटिकेच्या दासी तिला ती गोष्ट कळविण्यासाठी गेल्या. त्यावेळी ताटिका झोंप घेत होती. तिची झोंप घालविण्यासाठी त्या दासींना हजारों वृक्ष ताटिकेच्या कानाजवळ आपटावें लागले; तेव्हां ती जागी झाली. आपल्या वनांत मनुष्यें आलीं आहेत, असें वर्तमान दासींकडू कळतांच ती मोठ्या आनंदानें भक्ष्याच्या आशेनें श्रीरामचंद्राकडे धावू लागली. तेव्हां रामचंद्रानें आकर्ण धनुष्य ओढून एकाच बाणानें त्या त्या विक्रळवदनी ताटिकेचा नाश केला. ४ विश्वामित्राचा यज्ञ. 66 स्या दुष्ट व नीच राक्षसिणीचा श्रीरामचंद्रानें नाश केल्यावर पृथ्वीवरील सर्व लोकांना फार आनंद झाला. स्वर्गातून देवांनी श्रीरामचंद्रावर पुष्पवृष्टि केली. मग रात्रभर तेथेंच सर्वोनी मुक्काम केला. सकाळी सूर्योदय झाल्यावर तिघेही स्नानसंध्या उरकून पुढे जावयास निघाले. त्यावेळी श्रीरामचंद्राचा तो पराक्रम पाहून विश्वामित्र ऋषि अत्यंत प्रसन्न झाले; व त्यांनी अनेक शस्त्रास्त्रविद्या रामचंद्रास देण्याचा विचार केला. ते रामाला म्हणाले, रामा ! मला ज्या अनेक शस्त्रास्त्रविद्या माहीत आहेत, त्या देण्याला योग्य असा आजवर मला कोणी शिष्य आढळला नाहीं, परंतु त्या तुला दिल्या असता, तूं त्यांचें योग्य चीज करून, सांभाळही चांगल्या- रीतीनें करशील." विश्वामित्राचें तें भाषण ऐकून श्रीरामचंद्रास फार आनंद झाला, व तो विश्वामित्रास चंदन करून म्हणाला, “शस्त्रास्त्रविद्येत आपण माझे गुरू आइति, आपण त्या विद्या मला याण्यात. " मग विश्वामित्रानें रामचंद्राला धर्मचक्र, कालचक्र, मह्माख, रुद्राक्ष, धर्मपाश, कालपाश, शिवशूल, दज्जात्र, बह्मशिरात्र, आशिल, क्रौंचाल, मुसळ, कापाल, दोन सहस्र धनुष्यें, महाशक्ति, शिखरी, मोद- कीची मुष्टि, संहाराख, परिघास, किंकिणी, विद्याधरा, वरुणाख, अभिष्अख, मानवास,