पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय ४ था. २३ आणि तेथें त्यानें एक सरोवर मनाच्या लहरीनें निर्माण केलें; म्हणून त्या सरोवराला मानससरोवर असें ह्मणतत. त्या सरोवरापासून निघालेल्या या नदीला शरयू असे लणतात. या शरयूनदीचा व मागिरथीचा तेथें संगम झाल्यामुळे हा पाण्याचा कल्लोळ ऐकू येत आहे. पूर्वी या देशांत मदन सर्व अंगांसह राहून राज्य करीत होता; म्हणून या देशाला अंगदेश असें म्हणतात. त्या मदनानें आपल्या पराक्रमानें शंकरासहि बट्स केलें होतें; म्हणून शंकरानें आपला तृतीयनेत्र उघडून त्यास दुग्ध केलें. हल्ली याठिकाणी मोठे मोठे तपोनिधी तपःसाधनासाठी राहतात; आपण आतां आज रात्री त्यांच्याच आश्रमांत जाऊन राहूं. " असें सांगून विश्वामित्रानें त्या दोघांना तेथील ऋषींच्या आश्रमांत आणिलं. तेथें रामचंद्र व लक्ष्मण आल्यामुळे ऋषींना फार आनंद झाला; व त्यांनी रामलक्ष्मणांचा योग्य असा सत्कार केला. रामलक्ष्मणांनी त्या सर्व ऋषींना साष्टांग नमस्कार करून त्यांचा अशीर्वाद मिळविला. तेथें रात्रभर राहून सकाळी प्रातर्विधि आटोपल्यावर ते तिषेहि मार्ग क्रमूं लागले. बराच मार्ग कमिल्यावर एक अत्यंत विस्तीर्ण, निबिड व भयंकर अरण्य लागलें. ते अरण्य पाहून रामचंद्र विश्वामित्राला म्हणाला, “ ऋषे ! हें एवढें भयंकर अरण्य कोणाचें आहे, व हे अगदी निर्जन दिसत आहे, त्याचें कारण काय 1 तें मला रूपा करून सागांवें. " श्रीरामचंद्राचा तो प्रश्न ऐकून विश्वामित्र म्हणाले, “रामा 1 या अरण्यास ‘भैरववन ' असे म्हणतात. पूर्वी हैं अरण्य अत्यंत पवित्र असून तेथें अनेक ऋषि बगैरे पुण्यवान् लोक रहात होते. इंद्राने वृत्रासुराचा जेव्हां वध केला, तेव्हां इंद्राकडून दधीची ऋषीची हत्या झाली; ती त्याची ब्रह्महत्या या अरण्यांतील उदकानें स्नान केल्यानें नाहींशी झाली; इतकें हें अरण्य पवित्र होतें. अरण्यांत अनेक शहरें होती; आणि पशुपक्ष्यांनींहि तेथें वास्तव्य करून या अरण्यास शोभा आणिली होती, परंतु त्राटिकानांवाच्या राक्षसीनें हें अरण्य निर्जन करून टाकिलें आहे. ती यावत्प्राणिमात्रांचा संहार करते. गायी, म्हशी, बाघ, सिंह, मनुष्यें, पक्षी या सर्वांना भक्षण करून तिनें हैं अरण्य आपल्या ताब्यात घेतले आहे. या अरण्यांत त्या राक्षसीच्या भीतीनें कोणीहि प्रवेश करीत नाहीं, आणि कोणी चुकून आल्यास ती निर्दय त्याला खाऊन टाकिते. रामा ती राक्षसी पूर्वजन्मीं यक्षिणी होती. ती शापानें राक्षसीण झाली आहे. सी कथा अशी आहे की, सुकेतु या नावाचा कोणी यक्ष होता, त्यानें ब्रह्म. देषाला प्रसन्न करून घेऊन नऊ सहस्र नागांचे जिला बल आहे, अशी एक कन्या व्हावी, म्हणून वर मिळविला. त्याप्रमाणे त्या यक्षाला काही दिवसांनी मुलगी झाली, तिचें नाथ त्यानें ताटिका असें ठेविलें, व ती उपघर झाल्यावर सुंद- नावाच्या राक्षसाबरोबर तिचें लम करून दिले. पुढें ती यक्षिणी अग.