पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकस्पतर. [ स्तबक विश्वामित्रऋषीची ती मागणी ऐकून, दशरथराजाला मस्तकावर वज्यघात झाला, अथवा प्रळयकाळ जवळ आला की काय असे वाटलें. बृद्धपणी मोठ्या सायासाने आपणास पुत्र झाले, ते अद्यापि लहान असून त्यांना शस्त्रास्त्रविद्या मुळींच माहीत नाहीं; अशा लहान बालकांस दिले असतां न जाणो कदाचित् भलताच प्रसंग ओढावयाचा. बरें, न यावें तर विश्वामित्रकर्षांचा स्वभावही दशरथाला माहीतं होता. ते शाप देऊन भलतेंच कांहीं तरी करतील, अशीही मीति होती. अशा अडचणींत दशरथ सांपडल्यावर त्याला काय करावें तें कळेना. तो नम्रतेनें विश्वा- मित्राला, म्हणाला, “ऋपे | रामलक्ष्मण अद्यापि अज्ञान आहेत, त्यांना नेऊन आपला कार्यभाग होईल; असे मला वाटत नाहीं. तुमच्या कार्यासाठी मी आपलें सर्व सैन्य व सेनापतीला देतों; पाहिजे असल्यास बरोबर अष्टप्रधान देतों, किंवा मी स्वतः बरोबर येर्तो; परंतु रामलक्ष्मणांस घेऊन जाऊं नये. ते युद्धविद्येत अज्ञान असल्यामुळे त्या दुष्ट राक्षसांबरोबर त्यांचा मुळींच निभाव लागणार नाहीं." दश- रथांचें हैं भाषण हेकून मिश्वामित्रऋषि म्हणाले, “राजा । तूं आपणास चक्रवर्ती असें म्हणविर्तोस, परंतु श्रीरामचंद्रासंबंधानें तूं फारच अज्ञानी आहेस. अरे ! तो साक्षात् प्रभु श्रीवैकुंठपति दुष्टाच्या संहारासाठी तुझ्या पोटीं या स्वरूपानें आला आहे. त्याला अज्ञानी व युद्धविद्या न जाणणारा असें कसें म्हणतोस ? त्याच्या सर्व विद्या पूर्ण आहेत. त्याच्याच हातानें यज्ञसंहारक दुष्टांचा नाश होणार आहे; म्हणून तूं यासंबंधानें कांहीएक काळजी न करितां त्याला मजबरोबर दे." मग वसिष्ठानेंही दशरथराजाला, श्रीरामचंद्राला लक्ष्मणासह देण्यास सांगितलें; नाहीं तर हा विश्वामित्र रागावल्यास भलताच परिणाम होईल, असेंही दशरथाला बजाविलें. तेव्हां दशरथानें श्रीरामचंद्रास व लक्ष्मणास बोलावून आणून ऋषीबरोबर जाण्यास सांगितलें. मग त्यांनीं दशरथाला, गुरुला व मातोश्रींना वंदन करून आपआपली शस्त्रास्त्रे घेतली आणि ते विश्वामित्राबरोबर जाण्यास निघाले. विश्वामित्र त्या दोघांना बरोबर घेऊन अयोध्येतून चालला, तेव्हां हजारों लोक त्यांच्या दर्शनासाठी जमले होते. लोकांनी त्यांचा फार जयजयकार केला, स्वर्गी- तून देवांनीं पुष्पवृष्टि केली; व दुंदुभी वाजविल्या. याप्रमाणे रामलक्ष्मणास घेऊन विश्वामित्रऋषि शरयू नदीवर आला. तेथें तिघांनी स्त्राने वगैरे केल्यावर विश्वा- मित्रानें रामाला बला व अतिबला अशा दोन विद्या दिल्या, त्या विद्यांच्या योगानें पंधरा दिवसपर्यंत अन्नपाण्यावांचून रहातां येतें. पुढें विश्वामित्र त्या दोघांना बरो- वर घेऊन शरयू व भागिरथी यांच्या संगमावर आले. तेथें पाण्याच्या आघातामुळे मोठा ध्वनि होत होता, तो ध्वनि ऐकून रामचंद्र विश्वामित्रास म्हणाला, हा कसला ध्वनि होत आहे, व हें स्थान कोणाचें आहे ! तेव्हां विश्वा मित्र म्हणाले, रामा, कैलासपर्वतावर विरिंचीनें एक संवत्सरपर्यंत तप केलें, " ऋषे ! "" 66