पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ४ था. आपल्या मांडीवर घेऊन, तो तिर्चे कौतुक करूं लागला; आपण पुत्रप्राप्तीसाठीं प्रयत्न करणार होत; पण परमेश्वरानें प्रसन्न होऊन, आपणास ही कन्या दिली आहे. तेव्हां हिचें संगोपन पोटच्या मुलीप्रमाणें करणें हैं आपले कर्तव्य होय, असें जाणून त्या जनकराजानें ती मुलगी आपली कन्या आहे; असें सर्वांना कळविलें. अशारीतीनें | राजाला त्या अत्यंत सुंदर मुलीचा लाभ झाल्याबद्दल, नगरांतील लोकांना फार आनंद झाला; व त्यासाठी त्यांनी सर्व नगर शृंगारून मोठा उत्सव केला. नांगरानें भूमीवर काढिलेल्या रेषेला 'सीता' असे म्हणतात; व ती मुलगी नांगराच्या रेषेत सांपडली, म्हणून राजानें तिर्चे नांव 'सीता' असें ठेविलें. जनकानें तिर्चे संरक्षण केलें, म्हणून कित्येक तिला जानकी असेंही म्हणूं लागले. मिथिला नगरींत ती सांपडली, म्हणून मैथिली असेंही कोणी म्हणतात. क्रमाक्रमानें ती सीता जनकराजाचे घरीं वाढत असतां, एके दिवशी त्या जनकराजाचे घरांत एक मोठें अजस्र धनुष्य असलेले तिच्या दृष्टीस पडलें. जनकराजाचे कोणी पूर्व- जानें शंकरास प्रसन्न करून घेऊन तें मिळविलें होतें; परंतु त्या मोठ्या धनुष्याचा कोणास काही उपयोग नसल्यामुळे त्यानें तें एको पेटीत घालून एका बाजूस ठेविलें होतें. तो राजा वर्षातून एक वेळ त्या धनुष्याची पूजा करीत असे; त्या वेळी नऊशें टोणगे जुंपून तें अंगणांत आणीत व पूजा झाल्यावर पुन्हां टोणग्यां- कडून नेऊन ठेवीत. तें धनुष्य जानकीच्या दृष्टीस पडल्यावर तिनें त्या पेटींतून बाहेर काढिलें; व त्याचा काठीप्रमाणे घोडा करून ती अंगणांत खेळू लागली. तो प्रकार पाहून सर्व लोक थक्क होऊन गेले, ही मुलगी सामान्य नसून कोणीतरी विलक्षण शक्तिशाली देवता आहे; आपलें महद्भाग्य म्हणून आपणास कन्यारूपानें ही लाधली आहे, असें जनकराजाला वाटले. त्यानें त्याच वेळी सर्व मंत्रीमंड- ळाच्या अनुमतीनें असें ठरविलें कीं, जो हें धनुष्य उचलील त्यालाच ही सीता अर्पण करावयाची. ३ त्राटिकेचा मृत्यु. इकडे रामलक्ष्मणांचा व्रतबंध वगैरे होऊन, ते सोळा वर्षांचे झाल्यावर महातपो- निधि व उग्र असे विश्वामित्रऋषि दशरथराजाकडे आले, दशरथानें त्यांचा योग्य सत्कार करून त्यांना सिंहासनावर बसविलें व त्यांची पूजा वगैरे करून कोणीकडे येणें झार्ले ? म्हणून दशरथानें भीत भीत विचारिलें. विश्वामित्र म्हणाले, “राजा । ईश्वराच्या दयेनें सर्व कांही आहे, परंतु एक मोठें विघ्न उत्पन्न झाले आहे. आमचे यज्ञयागाचे वेळीं राक्षस रक्त, मांस, व हाड़ें वगैरे अमंगल पदार्थ यज्ञभूमीवर टाकून यज्ञाचा विध्वंस करितात. त्या दुष्टांच्या नाशासाठीं तुझा रामचंद्र व लक्ष्मण मला दहा दिवस दे. मी त्या राक्षसांस शाप देऊन नाहींसें केलें असतें; परंतु शापानें तपाचा नाश होतो, म्हणून तुजकडे रामचंद्रास मागण्यासाठी आलों आहे."