पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु [ स्तबक D श्रीविष्णूवांचून सर्व पुरुष माझे बंधु आहेत. श्रीपतीलाच वरण्याचा माझा विचार झाला आहे, तो निश्चय मी कधीही मोडणार नाहीं." वेदवतीचें तें निग्रहाचें बोलणें ऐकून राषणानें तिला बलात्कारानें लंकेस नेण्याचा विचार मनांत आणिला व तो तिचा हात धरूं लागला. तेव्हां वेदवतीने रावणाला शाप दिला किं. 'तुला या नीच वासनेबद्दल नरक प्राप्त होईल.' असा शाप देऊन वेदवतीनें एका अग्नि- कुंडांत उडी टाकली; व त्यांत ती तत्काल अदृश्य झाली. तो विलक्षण प्रकार पाहून रावणाला फार आश्चर्य वाटलें, व त्याला आपल्या अविचारी कृत्याबद्दल फार पश्चात्ताप होऊं लागला; तेव्हां त्यानें पाणी आणून तें कुंड विझविलें व त्यांत त्या वेदवतीचा शोध करूं लागला; परंतु वेदवती न सांपडता त्या कुंडीत त्याला एक अत्यंत तेजस्वी असें रत्न सांपडलें. तें रत्न घेऊन तो लंकेस परत आला; व त्यानें तें रत्न एका पेटीत घालून मंदोदरीकडे पाठवून दिलें. मंदोदरीनें ती पेटी रात्री उघडून पाहिली, तो त्यांत रत्न नसून एक सुंदर कन्या आहे; तो प्रकार पाहून तिचे अंतःकरणांत भांति उत्पन्न झाली, व या कन्येला आपल्या घरांत ठेवल्यास आपलें कांहीं तरी अनिष्ट होईल, असें वाटून तिनें ती पेटी बंद केली, व आपल्या पतीकडे ती पाठवून देऊन तें रत्न पूर्वठिकाणी नेऊन ठेवण्यास सांगितलेल्याप्रमाणें रावणानें तो पेटी पुन्हां मिथिला नगरीस परत पाठविली; व यज्ञकुंडाचे जागीं पुरून ठेविली. में २ जमिनींत सांपडलेली मुलगी. या गोष्टीस कांहीं वर्षे गेल्यानंतर मिथिलानगराच्या जनकराजानें पुत्रप्राप्ती- साठी यज्ञ करण्याचें मनांत आणिलें. त्याचा गुरु शतानंद या नावाचा होता, त्याला त्या जनकराजाने आपला मानस कळवून यज्ञाची तयारी करण्यास सांगितलें. राजानें सांगितल्याप्रमाणे यज्ञासाठी चांगली भूमि शोधित असतां तो शतानंद क्षिप्रेच्या कांठीं आला, व जेथें वेदवतीनें अभिसाधन केलें होतें, तीच भूमि त्यानें यज्ञासाठी पसंत केली. वेदवतीच्या अभिसाधनाला कित्येक वर्षे झाल्यामुळे त्या भूमीवर शेतकरी लोक शेती करीत होते. ती जागा शतानंदानें राजदूतांना सारखी करण्यास सांगितल्यावर राजदूत नांगर घेऊन ती जागा सारखी करूं लागले, तेव्हा एका नांगराच्या फाळाला ती पेटी लागून वर आली. राजदूतांना ती पेटी पाहून मोर्डे आश्चर्य वाटलें. पेटींत काय आहे, ते पाहण्याची त्यांना जिज्ञासा झाली. जमीन उकरून त्यांनी पेटी बाहेर काढली; व उघडून पाहतात तों आंत एक हास्यमुखी सुंदर कन्या खेळत आहे, असें दिसलें. ती विलक्षण सुंदर मुलगी त्या पेटींत कशी आली, व ती पेटी तेथें त्या कन्येसह किती दिवस होती, याचा उलगडा त्यांना मुळीच करितां येईना. त्यांनी ती पेटी जनकराजापुढे नेऊन ठेविली व ती कशी सापडली, वगैरे सर्व हकीगत राजाला सांगितली. राजाला ती हकीकत ऐकून फार आश्चर्य वाढलें, त्यानें ती पेटी उघडून त्या मुलाला बाहेर काढिले व तिला