पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

L ३ रा. ] अध्याय ४ था. ( कन्या व्हावी. सदिच्छा करून तो आपलें कार्य जे वेदपठण तें करितां करितां त्याच्या मुखांतून एक सुंदर कम्या बाहेर पडली. त्या मनोहर मुलीची अशा- रीतीनें प्राप्ती झालेली पाहून सुतश्रवा ब्राह्मणाला फार आनंद झाला. तो आपल्या स्त्रियेला म्हणाला; आपण ज्या कन्येची इतके दिवस इच्छा करीत होतों, ती कन्या अशारीतीनें आपणास प्राप्त झाली आहे. त्या कन्येच्या प्रातीमुळे त्या ब्राम्हणाच्या स्त्रियेलाहि फार आनंद झाला, वेदपठण करीत असतां तिची प्राप्ति झाली म्हणून त्यांनी तिचें नांव ' वेदवती असें ठेवून दोघेंहि त्या मुलीचें परमप्रीतीनें संगोपन करूं लागली, परंतु त्या मुलीला विष्णूची प्राप्ति झालेली पाहण्याचें त्या दोघांचे नशिबी नव्हते. त्या मुलीला तारुण्य प्राप्त होतें न होतें तच सुतश्रवा ब्राह्मण मृत्युवश झाला, तेव्हां त्याच्या स्त्रियेनें आन- प्रवेश केला. याप्रमार्णे त्या वेदवतीला अल्पवयांत तिच्या आईबापांनी सोडले. तरी तिनें आईबापांचा हेतु मनांत धरून प्रयत्न चालविला होता. लग्न श्रीपती• बरोबरच करावयाचे असा तिर्ने निश्चय केला होता. प्रभूंची प्राप्ति व्हावी, म्हणून तिर्ने मिथिला नगरास जाऊन क्षिप्रानदीचे कांठीं तप करण्यास आरंभ केला, चार बाजूला चार कुंडें तयार केली, त्यांत काष्ठे घालून तीं प्रदीप्त केली; व त्या चारही कुंडांच्या मध्यभागी बसून ती ईश्वराराधना करू लागली. याप्रमाणें ती वेदवती प्रभूचें चिंतन करीत तेथें बसली असतां, एके दिवशीं रावण विग्विजय करून लंकेस परत जात असतां तेथें आला. त्याच्या दृष्टीस ती अनुपमेय रुपवती अशी वेदवती ' पडल्यावर तिच्याविषयी त्याचे मनात पापवासना आली. तो त्या वेदवतीजवळ जाऊन म्हणाला; “ हे तरुण स्त्रिये ! तूं आपलें हें सुंदर शरीर या अग्नीच्या तापानें निष्कारण कां कष्टवीत आहेत, ते मला कळत नाहीं. हें तूं कोणतें तप करीत आहेस, आणि तें कशासाठी करीत आहेस, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. " तेव्हां ती वेदवती म्हणाली, " अरे ! मी हा प्रयत्न बैकुंठ- पतीच्या प्राप्तीसाठी करीत आहे; त्यानें येऊन माझा स्वीकार करावा; म्हणून मी हैं तप करीत आहे. " है ऐकून रावण म्हणाला, हे त्रिये ! तुझा प्रयत्न वेडेपणाचा आहे. माझ्या भीतीनें विष्णु पळून जाऊन क्षीरसागरी लपून बसला आहे, तेव्हां मी असता॑ त्या नारायणाची प्राप्ति तुला होणें मुळींच शक्य नाही. अमरावतीचे सर्व देव मी जिंकून त्यांना आपले दास केले आहेत, भी आपली सर्व कार्मे त्यांच्याचकडून करवून घेतों. पृथ्वीवर छत्रचामरें माझ्याच मस्तकावर ढळत आहेत, अनेक सुंदर स्त्रिया माझा अमिलाष भरून ह्या रावणाची पट्टराणी होण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेव्हां तूं जर माझा स्वीकार करशील तर त्यांत तुझें कल्याण असून मलाही मोठा संतोष होणार आहे. मी तुला आपली पट्टराणी करीन, आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे वागत जाईन. " रावणाचा तो उन्मत्तपणा पाहून वेदवतीला राग आला. ती म्हणाली, " रावणा ! 6