पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकस्पतरू. [ स्तबक वस्था मुळींच जड गेली नाहीं. तिचे दिवस पूर्ण झाल्यावर चैत्र शुद्ध नवमीचे दिवशीं बौदा घटकांनी पुनर्वसु नक्षत्र असतां ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला, तोच प्रभु श्रीरामचंद्र होय. श्रीरामचंद्राचा जन्म त्रेतायुगांत झाला. त्या प्रभूच्या तेजानें सूर्याचे किरण फिकट दिसूं लागले. नगरांतील लोकांना त्या आनंददायक वार्तेमुळे अस्यंत हर्ष झाला; जिकडे तिकडे ध्वजापताका उभारून सर्व शहर शृंगारून काढिलें, स्वर्गोत देव तर त्या आनंदामुळें नाचावयाला लागले; दुंदुमी बाजावयाला लागल्या; आकाशांतून पुष्पवृष्टि होऊं लागली; दशरथानें विशांना व गोरगरीब प्रजाजनांना भोजन देऊन अनेक दानें दिलीं. पुत्रप्राप्तीमुळे आज आपण पितृऋणांतून मुक्त झालों, या आनंदानें दशरथाचें मन प्रफुल्लित झालें होतें. प्रसूतिगृहांत जाऊन त्याने मोठ्या प्रेमानें पुत्रमुखावलोकन केलें, व वसिष्ठास त्या मुलाची पत्रिका करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वसिष्ठानें पत्रिका तयार करून त्यांत असें वर्तविलें किं, ' याला दोन पुत्र होतील, हा एकपत्नीव्रतानें राहील, हा एकछत्री राज्य करील, हा सज्जनांचें संरक्षण करून दुर्जनांचा संहार, करील, हा अत्यंत पितृभक्त असा होईल, सामुद्रिक लक्षणांवरून हा साक्षात् ईश्वर आहे. कौसल्या प्रसूत झाल्यावर कैकयी प्रसूत झाली, तिलाही पुत्रच झाला. त्याचें ना॑व भरत अर्से ठेविलें. सुमित्रा प्रसूत झाली तेव्हां तिला दोन पुत्र झाले, 'त्यांची नांवें लक्ष्मण व शत्रुघ्न अशीं ठेविलीं. याप्रमाणे पुत्र नसल्यामुळे राज्य- कारभार सोडून वानप्रस्थाश्रम घेणाऱ्या दशरथराजाला शृंगऋषीचे कृपेमुळे चार पुत्र झाले; व तो पुढे त्या पुत्रांसमवेत आनंदानें राज्यकारभार करूं लागला. वा- ल्मीकि रामायणांत यासंबंधानें थोडी वेगळी कथा आहे, तींत सुमित्रेस एक व कैकयीस दोन पुत्र झाल्याचें वर्तमान आहे. “ याप्रमाणे प्रभु श्रीरामचंद्रांनी रावण, कुंभकर्णाच्या हननासाठी अवतार घेत- ल्यावर त्यांच्या साह्यासाठी देवांनी पृथ्वीवर वानर जातींत जन्म घेतला. सूर्य सुग्रीष झाला, इंद्र वाली झाला, शंकर हनुमान् झाला, बह्मदेव जांबुवंत झाला, बृहस्पतीचा मु लगा अंगद झाला, कुबेर गंधमादन झाला, अभि नीळ झाला, याप्रमाणे निरनिराळ्या देवांनीं निरनिराळ्या भूमिका घेऊन ते पृथ्वीवर प्रभूच्या साह्यासाठी अवतीर्ण झाले.” अध्याय ४ था. १ रावण व वेदवती. वैशंपायन ऋषि म्हणाले, "( राजा जनमेजया ! प्रभु श्रीरामचंद्राचें ज्या आनकीबरोबर पुढे लम झाले, त्या जामकीची कथा तुला सांगतों. सुतश्रवा या नावाचा एक विद्वान्, सदाचारी व सुशील असा बाह्मण होता, त्याची व त्याच्या खियेची इच्छा होती की, पिष्णूच्या बामांकावर शोभेल, अशी आपणास एक