पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय २ रा. केली होती. सुशीलेची इच्छा आपणास एक सुंदर सुशलि व सर्व गुणसंपन्न अशी मुलगी व्हावी, अशी होती. त्याप्रमाणे ती इच्छा धरून तिनें पार्वतीची पुष्कळ दिवसपर्यंत सेवा केल्यावर देवी पार्वती तिला प्रसन्न झाली व तिनें तिला तुझा इच्छित मनोरथ पूर्ण होईल, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर सुशी- लेला लवकरच • गर्भधारण होऊन ती योग्य दिवसांनी प्रसूत झाली, व तिला एक सुंदर मुलगी झाली. हीच मुलगी प्रभावती ही होय. ११ सुंदर नाहीं, राजकन्या प्रभावती ही फार सुशील असून तिचे सौंदर्य तर अप्रतीम होतें. तिचा वर्ण कांचनाप्रमाणे संतेज व गौर असा होता. ती फार उंच नाहीं व ठेंगणी नाहीं अशी मध्यम बांध्याची असून तिचें मुखकमल चंद्राप्रमाणें आल्हाद देणारें होतें. पण तिच्या सुंदर आननाला चंद्राची उपमा देणें हें बरें नव्हे; कारण चंद्र हा गणपतीच्या शापामुळे निस्तेज झाला असून गुरूच्या शापानें त्याच्या मुखाला काळे डाग पडले आहेत. तिच्या मुखाला कमळाची उपमा द्यावी असे वाटतें, पण तसे करण्यासहि धैर्य होत कारण कमलिनी ह्या 'भ्रमराबरोबर व्यभिचार करणाऱ्या असून सूर्यास्तानंतर वैधव्य भोगणाऱ्या आहेत, तेव्हां तिच्या मुखाला कमलाची उपमा देणें हा वेडेपणाच होय. सारांश तिचें वदन अनुपमेय असें होतें. तिचे नेत्र मृगनय- नापेक्षांहि सतेज व मनोहर होते. तिच्या भीवयांकडे पाहून धनुष्यास, कटिप्र- देशाकडे पाहून सिंहास व चालण्याकडे पाहून हस्तिनीस लाज वाटावी असे ते तिचे अवयव मनोहर असून चालणें नयनरंजक होतें. तिचा केशकलाप मृदु असून तिचे मांसल भुजदंड मस्तसर्पिणी प्रमाणे दिसत होते. वज्रनाभासारख्या तामसी मनुष्याच्या पोटी जरी तिनें जन्म घेतला होता, तरी ती प्रभावती शांत प्रकृतीची व सात्विक वृत्तीची होती. तिचें आचरण अत्यंत शुद्ध व प्रेमळ असें होतें. ईश्वरावर तिची दृढ निष्टा असून ती साधुसंताचा चांगल्या प्रकारें सत्कार करीत असे. आपणास आपणाप्रमाणेंच सुशील, शांत स्वभावाचा, ईश्वरनिष्ठ व पराक्रमी पति मिळावा, अशी तिची स्वाभाविक इच्छा होती, व ती इच्छा पूर्ण व्हावी ह्मणून ती दुर्वास ऋषीची पूज्य बुद्धीनें सेवा करित असे. पुष्कळ दिवस पर्यंत एक निष्ठपणें तिनें दुर्वास ऋषीची सेवा व सुश्रूषा केल्यावर दुर्वास ऋषि तिचा भाव ओळखून तिला प्रसन्न झाले. त्यावेळी दुर्वासऋषीनीं प्रभावतीला असा आशीर्वाद दिला कीं, " हे प्रभावती, तुझा विवाह सद्वंशांतील सुशील व सुंदर मुलाबरोबर होऊन तुझें सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुझी दोघेहि सुखाने नांदाल व चिरंजीव व्हाल. राज्यादि वैभवाचा तुझाला चिरकाल लाभ मिळेल. " अशा प्रकारें दुर्वास ऋषीनी आशीर्वाद दिल्यावर प्रभावतीला फार आनंद झाला. त्या दुर्वास ऋषीच्या वाणीवर भरवसा ठेवून ती निश्चित चित्तानें विवाह