पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ३ रा. ● उदरीं जन्म घेईंन, त्यासंबंधानें तुम्ही कांहींही काळजी करूं नये; व तुम्हीं व्हा.” याप्रमाणें देवांनां आश्वासन मिळाल्यावर देव आपआपले स्थानीं निघून गेले. आयोध्येस पुत्रकामेष्टी यज्ञ चालला असतां पूर्णाहुतीचा समय आला, तेव्हां शृंगऋषींनी मंत्रोच्चार करून राजाचे हातांत स्रुवा देऊन, श्रीहरीच्या प्राप्ती- साठी यज्ञकुंडात पूर्णाहुती टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजानें यज्ञकुंडीत पूर्णाहुतौ टाकिल्याबरोबर कुंडांतून महाअद्भुत अशी प्रजापति या नांवाची देवता निघाली. ती देवता कृष्णवस्त्र परिधान केलेली असून कृष्णवर्णाचीच होती; परंतु त्या देवतेचें तेज कोटी सूर्याप्रमाणें आरक्त होतें, वाहन मेंढ्याचें असून त्या देवतेला दोन तोंर्डे होती. त्या देवतेच्या हातांत सुवर्णपात्र असून त्या पात्रांत कामधेनूच्या दुधाची क्षीर होती. ती देवता शृंगऋषीला म्हणाली, "हैं शंगऋषे ! तुझ्या मंत्रशक्तीनें मी तुला प्रसन्न होऊन हा प्रसाद देत आहे, याची तूं आपल्या इच्छेप्रमाणें व्यवस्था कर. हें क्षीरयुक्त दिव्यान्न असून ते जी खी भक्षण करील तिला सुलक्षणी व महापराक्रमी असे पुत्र होतील. असें म्हणून ती प्रजापतिदेवता तत्काल विजेप्रमाणें नाहींशी झाली. नंतर शृंगऋषीनें ती क्षीर दशरथाजवळ देऊन 'आपल्या स्त्रियांना भक्षण करण्यासाठी दे म्हणून सांगितलें, दशरथानें त्या अन्नाचें दोन भाग करून एक भाग कौशल्येला दिला व एका भागांतील अर्धा भाग सुमित्रेला दिला; बाकी राहिलें होतें त्याचे दोन भाग करून एक कैकयीला दिला व राहिलेला राजानें सुमित्रेवर अधिक प्रीति म्हणून तिलाच दिला. प्रत्येकीनें आपआपला पिंड भक्षण केल्यावर मागून मिळालेल्या भागाचे काय करावें, या विचारांत सुमित्रा होती, तोंच तिच्या हातांतला पिंड घारीने उचलून नेला; तो त्रिकूट पर्वतावर पडल्यावर तो विश्रव्याच्या स्त्रीनें मक्षण केला, तेव्हां तिला त्यापासून विभीषण व त्रिजटा अशी दोन अपत्ये झालीं. असो, दशरथाचे घरीं यज्ञयागादि कृत्यें यथासांग पार पडल्यावर शृंगऋषीनें अंगदेशी जाण्याची इच्छा दर्शविली, तेव्हां दशरथ राजानें सर्व ऋषींचा सत्कार करून व त्यांना भोजनदक्षिणा वगैरे देऊन आपल्या वाहनांतून त्यांच्या घरी त्यांना पोहोंचतें करून दिले. त्याप्रमाणें शृंग- ऋषींनाहि वर्षे, अलंकार वगैरे देऊन त्यांच्या स्त्रियेसह त्यांना पोहोंचतें केलें. , ? ४ दशरथाला पुत्रप्राप्ति. दशरथाच्या तीनही स्त्रियांना त्या अन्नप्रसादामुळे गर्भ राहून त्यांच्या शरीरावर गर्भतेज दिसूं लागले. तिघींना त्या गर्भावस्थेंत निरनिराळे डोहाळे होऊं लागले. कथाकीर्तनें ऐकावीत, दैवांच्या व विप्रांच्या पूजा कराव्यात, सडासंमार्जन करून तुलसीवृंदावनास रंग द्यावा, नेहमी आनंदानें रहावें, सर्वत्र उत्सव करावा, अशा- प्रकारचे उत्तम ढोहाळे कौशल्येला होत होते, त्यामुळे कौशल्येला ती गरोदरा-