पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु [ स्तबक महापराक्रमी व कीर्तिशाली असे चार पुत्र होतील." नंतर दशरथ, रोमचरण, जनक, काशीश्वर, वगैरे राजांनी एक उत्तम श्यामकर्ण मिळवून तो पृथ्वीवरून हिंडवून आणिला. श्यामकर्ण आल्यावर शृंग ऋषीनें दशरथास यज्ञदीक्षा देऊन ऋत्विजांस वरिलें व वसंत काळ लागल्याबरोबर दक्षिणाग्नि, गार्हपत्य व आह- बनीय, या तिनही अग्नींची स्थापना करून होमास आरंभ केला. राजानें त्या वेळी सर्व ब्राह्मणांनां इच्छादान व इच्छाभोजन देण्याचा क्रम ठेविला होता. श्यामकर्णाच्या सर्व अवयवांची आहुती दिल्यावर शेवटी पूर्णाहुतीचे वेळी मस्तकाची आहुती दिली. व याग पुरा केला. त्यावेळी दशरथ राजानें सर्व पृथ्वी ब्राह्मणांस दान करण्याचा विचार केला व तशा संकल्पाने हातांत उदक घेतलें, परंतु ब्राह्मण ह्मणाले; "राजा ! पृथ्वीचें संरक्षण आह्मांस करितां येणार नाही. वेदाचे पठण करून पट्कमचे संरक्षण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. ब्राह्मणास गाय दिली असतां पृथ्वीदानाचें पुण्य लागते, तेव्हां आम्हांस तूं गायी दान दे हणजे झालें." मग दशरथ राजानें त्याप्रमाणे ब्राह्मणांना सवत्स व सालंकृत एक लक्ष गायी दान दिल्या. १६ या यज्ञसमातीनंतर शृंगऋषि दशरथराजाला ह्मणाला; राजा ! या यज्ञाच्या योगानें तुझें व तुझ्या प्रजाजनांचें संपूर्ण पातक नाहीसे झाले आहे. आतां पुत्रप्राप्तीसाठीं पुत्रकामेष्टी यज्ञ केला पाहिजे. तो यज्ञ पूर्ण झाल्यावर तुला पराक्रमी, धनुर्धर, पुण्यशील व शत्रूरूपवृक्षांस कुठाररूप असे चार पुत्र होतील. असे सांगून गऋपीनें पुन्हां शरयू नदीचे कांढी पुत्रकामेष्टी यज्ञाची तयारी केली. यज्ञासाठीं दूंगऋपीनें देवांना मंत्राने आह्वान केल्याबरोबर गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, सनत्कुमार, ब्रह्मा, इंद्र, महादेव, विष्णु, वगैरे सर्व अयोध्येस प्रत्यक्ष आले. त्या सर्वांना दशरथराजाने साष्टांग नमस्कार घालून त्यांची पोडशोपचारांनीं पूजा केली. डांगऋषीची मंत्रशक्ति कांहीं विलक्षण होती. ज्या देवतेस आव्हान करावें ती ती देवता प्रत्यक्ष येऊन आपला हविर्भाग घेत असे. ती विलक्षण मंत्रशक्ति पाहून देवांनां परम संतोष झाला, व इतरांनां आश्चर्य वाटून त्यांची शृंग ऋषीविषयींची पूज्यबुद्धि वाढली. इकडे रावण व कुंभकर्ण शंकराच्या वरदानानें उन्मत्त होऊन त्यांनी सर्वांनां चाही भगवान करून सोडले होते. तेव्हां सर्व देवांसह ब्रह्मदेव क्षीरसागरों जाऊन प्रभूला ह्मणाला; " हे अनंता नारायणा ! रुद्राच्या वरदानानें रावण व कंभकर्ण उन्मत्त होऊन लोकांनां अत्यंत त्रास देत आहेत, तरी आपण अवतार घेऊन त्या दुष्टांचा संहार करावा. आपणास अवतार घेण्यास योग्य असें स्थळ अयोध्येत दशरथराजाकडे आहे. आम्हीहि आपल्या साह्यासाठी पृथ्वीवर वानर- जन्म घेऊन आपले दास्यत्व करूं. " देवांची ही विनंति मान्य करून भगवान् म्हणाले, " मी तुमच्या इच्छेप्रमाणे अयोध्येत लवकरच कौसल्येच्या