पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ३ रा. १५ मनांतला राग सोडून दिला व तो आपल्या मुलाला व सुनेला प्रेमानें जाऊन भेटला. नंतर यज्ञाची तयारी करून होमहवनास आरंभ केला; त्या ट्रांग ऋषीने अनींत दिलेल्या अवदानानें देवता तेव्हांच प्रसन्न झाल्या, व पृथ्वीवर योग्य असा पर्जन्य पहूं लागला. तो अंग देश बारा वर्षे पर्जन्य नसल्यामुळे अगदी रुक्ष झाला होता, लोक निस्तेज झाले होते, व राजा काळजीनें ग्रस्त झाला होता; अशा स्थितींत जसा पाहिजे होता तसा पर्जन्य पडूं लागल्यावर सर्वाच्या आनंदास सीमा उरली नाहीं. चोहोंकडून शंग ऋषीला धन्यवाद मिळू लागले. अंग देश धनधान्यांनी समृद्ध दिसूं लागला, व लोकांचे चेहरे प्रफुल्लित झाले. ३ पुत्रकामेष्टि यज्ञ. हा प्रकार दशरथाचे कानावर गेल्यानंतर त्यासही अत्यंत आनंद झाला, व त्या ऋषीनें कृपा केल्यास आपणासही पुत्र होतील असा भरवंसा त्याला उत्पन्न झाला. मग त्यानें रथ, पालख्या, सैन्य, वाजंत्रीवाले वगैरे लवाजमा सज करून त्यासह तो व सुमंत प्रधान अंग देशांतश्रृंग ऋपीला आमंत्रण देण्यासाठी आले. बहुमूल्य अशा वस्त्रालंकारांनी ऋषीचा सत्कार करून त्याची पूजा केली, व त्याच्या चरणावर मस्तक ठेवून दशरथ राजा म्हणाला; "डांगऋपे ! या रोमचरण राजावर कृपा करून त्याला जसे सुखी केलें, तसें या दासालाही सुखी करावें; आपल्या चरणाचे रजःकण त्या अयोध्येत पडल्यास मी व माझे प्रजाजन धन्य होतील, आणि आपण जर कांही प्रयत्न कराल तर मला पुत्रप्राप्ति होऊन सूर्यवंश कायम राहील." दशरथानें शृंग ऋषीची अशी विनंति केल्यावर शांतेनेंहि आपल्या पतीला विनंति केली. ती म्हणाली; " स्वामी ! माझा खरा पिता दशरथच आहे, रोमचरण हा माझा पालक पिता आहे; तर माझ्या खन्या पित्यासाठी कांही प्रयत्न करून त्याच्या वंशाची वृद्धि आपण अवश्य करावी. " याप्रमाणे दोघांनांग ऋषीची विनंति केल्यावर तो आपले स्त्रियेसह राजाबरोबर मोठ्या समारंभानें अयोध्येस आला. ांग ऋषी आल्याचें ऐकून अयोध्येतील सर्व आबालवृद्धांनां आनंद झाला व त्यांनीं तो आनंद सर्व शहरांगारून व्यक्त केला. मग त्या शृंग ऋषीने सुमुहूर्त पाहून पवित्र अशा शरयू नदीचे कांठीं राजाकडून यज्ञासाठी मंडप बांधविला; यज्ञ- कुंडे तयार करविली, यज्ञासाठी लागणारी सर्व प्रकारची यज्ञसामुग्री मिळविली; व विद्वान् अशा ऋषींना निमंत्रण पाठवून यज्ञासाठी बोलावून घेतलें. यश पाह- ण्यासाठी म्हणून कित्येक देशचे राजेही आले वामदेव, जाबाली, शातातप, संजय, वसिष्ठ, कश्यप, कौंडिण्य, कण्व, गौरमुख, पाराशर, बकदात्म्य, शतानंद, सुमंतु, सौभरी, वेदविद, गार्ग्य, मार्केडेय, नारद, कौशिक याप्रमाणे अनेक ऋषि आल्यावर समुहूर्तावर अंग ऋोने यज्ञास आरंभ केला. भृंग ऋषी म्हणाला, हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडल्यास दशरथ राजाला 66