पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ कथाकलक्तरु. [ स्तबक दर्शनाने लोक, सर्व कांहीं विसरून जातात, व जो याना हस्तस्पर्श करतो, त्याच्या पातकाचा नाश होतो; आम्हीं भस्माऐवजी अंगाला चंदनः लावितों, त्रिपुंड्राऐवजी कुंकुमतिलक लावितों, जटाभार मस्तकावर न ठेवितां केसांची वेणी गुंफून ती पाठीवर मोकळी सोडितों. आमचें आसन पद्मासन हे होय. " असें ह्मणून त्या गणिकेनें पद्मासन घातले वांगऋषीला शरीरासन्निध घेऊन त्याला कामसुखाचा लाभ दिला. तेव्हां दूंगऋषीला अष्टभाव उत्पन्न झाले व त्याच्या नेत्रांतून त्या सुखप्राप्तीमुळे आनंदाश्र पडले. तो त्या गणिकांना म्हणाला; हा तुमचा आश्रमधर्म आमच्या आश्रमधर्मापेक्षां फार चांगला आहे. या धर्माचा मला माझ्या बापानें कांही उपदेश केला नाहीं. मी आतां हा तुमचाच धर्म स्वीकारून तुमच्या आश्रमांत येतो." याप्रमाणे शृंगऋषीनें सांगितल्यावर त्या गणिकांनी त्या ऋषीला मोठ्या सत्कारानें अंग देशांत आणिलें. २ दुष्काळ निवृत्ति. अशा रीतीने त्या दूंगऋपीला गणिकांनी फसवून आणल्यावर त्यांनी ती बातमी दूताकडून राजाला कळविली; त्या वेळी राजाला अत्यंत आनंद झाला. मग राजा आपणाबरोबर रथ, पालख्या, वगैरे घेऊन येऊन त्या शृंगऋपीला सामोरा आला, त्या ऋषीच्या आगमनामुळे अवर्षणानें त्रासलेल्या प्रजाजनांनाहि अत्यंत हर्ष झाला, व तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी गुढ्या तोरणें उभारून ऋषीवर फुलें व गुलाल उधळला. राजानें ऋषीला अनेक वाद्यांच्या गजरामध्ये आपल्या राजधानीत आणून सिंहासनावर बसविलें. त्याची पूजा केली व त्याला अशा रीतीनें फसवून आणल्याबद्दल त्याची अनन्यभावानें क्षमा मागितली. याप्रमाणे ऋपीला प्रसन्न करून घेतल्यावर त्या रोमचरण राजाने आपली तरुण व परम रूपवती अशी शांता नांवाची राजकन्या त्याला अर्पण करून त्यास गृहस्थ केले. श्रृंगऋपि गृहस्थ झाल्यामुळे स्वर्गातील इंद्र, यम, वगैरे देवांना मोठा संतोष होऊन त्यांनीहि त्या प्रसंगी आनददर्शक वाद्ये वाजविली. मग त्या रोमचरण राजानें शृंग ऋषीचा बाप जो विभांडक ऋषि, त्याच्याकडे आपले प्रधानास पाठवून त्यास बोलाविलें; त्या विभांडकाची योग्य सत्कारानें पूजा करून रोमचरण राजा म्हणाला; “ऋषि ! मी आपल्या मुलास कुटिलनीतीनें फसविलें, या अपराधा- बद्दल मला क्षमा करावी; हे कृत्य मी केवळ मजकरितां केले नसून सर्व प्रजाज़- नांचे संरक्षणासाठी केले. आपल्या पुत्राच्या हस्तानें यज्ञ झाल्यास पृथ्वीवर पर्जन्य पडेल असे मला वद्रिकाश्रमींच्या ब्राम्हणांना सांगितले आहे. त्या यज्ञ- कार्यासाठी मी आपली स्वतःची कन्या आपल्या मुलाला देऊन गृहस्थ केले आहे, व माझ्या पश्चात् हे राज्यहि आतां त्याचेंच आहे; यावरून असे करण्यांत माझा कांहीं पापहेतु नाहीं, हे आपणास सहज दिसून येईल. " याप्रमाणे त्या रोमचरण राजानें विभांडक ऋणीची प्रार्थना केल्यावर, विभांडकानें आपले