पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ३ रा. १३ अधिक प्रदीप्त होतो, त्याप्रमाणें शृंग ऋषीचा काम अधिक बलवत्तर झाला, परंतु असें कां होत आहे, हें त्याला कांहींच कळेना. त्यानें त्या गणिकांता आपल्या सान्निध बसविलें, व तुम्हीं कोण ऋषि आहां, म्हणून विचारिलें; तो शृंग- ऋषीचा प्रश्न ऐकून गणिकांना मोठे आश्चर्य वाटलें; तेव्हां गणिका म्हणाल्या; “ ऋषि ! आम्हीं गलंड ऋषि आहोत, सर्व तीर्थे भ्रमण करीत करीत आज आपल्या दर्शनाला आलों; आपलें दर्शन झाल्यामुळे आम्हांस अत्यंत आनंद झाला आहे." नंतर त्या गणिकांनी बरोबर आणलेली पक्कान्नें, फळें, वगैरे खाण्याविषयों शृंगऋषीस विनंति केली, सदोदित कंदमूलांवर निर्वाह कर णाऱ्या शृंगऋषीला इतके दिवसपर्यंत गोड, खारट, तिखट, वगैरे पदार्थांची रुचि मुळीच माहित नव्हती, आणि त्यामुळे त्याला कधी कामवासनाहि होत नव्हती; परंतु तीं निरनिराळीं पक्कान्नें, व द्राक्ष, डाळिंब, फणस वगैरे फळे खाल्लयावर व ऊंसाचा गोड रस प्याल्यावर त्याचें मन साहजिक विकारयुक्त झाले; लो गणिकांना म्हणाला; "गलंड ऋषीहो ! हे तुमचें अन्न, हें गोड पाणी वहीं मधुर फळे खाऊन माझी चित्तवृत्ति फार प्रसन्न झाली आहे. तुम्हीं आपल्या आश्रमांत हेंच अन्न रोज खातां काय ?" तेव्हां त्या गणिका ह्मणाल्या, “ऋषि ! आमच्या आश्रमांत आम्ही याच अन्नाचा नेहमीं उपयोग करतों. आमच्या आश्रमाजवळ इक्षुरसाची नदी असून तिची वाळू साखरेची आहे. आश्रमांतील झाडांनाही अशी सुंदर व मधुर फळे बाराहि महिने असतात. सुगंधी द्रव्याचे तर कूपच्या कूप भरलेले आहेत." त्या गणिकांच्या आश्रमाचें तें विलक्षण वर्णन ऐकून शृंगऋपीला तो आश्रम पाहण्याची इच्छा झाली; तो गणिकांना म्हणाला; " गलंड ऋषीहो ! त्या तुमच्या रम्य आश्रमांत तुमच्या सहवासांत राहून कांहीं देहाचें सार्थक करावें, अशी माझी इच्छा आहे; तरी तुमचें उपास्य दैवत कोण, तुमचें तप कोणतें, व्रत कोणतें, तुमचें समाधिलक्षण कसें आहे, तुमचें प्रणवसाधन कोणत्या प्रका- रचें आहे, वगैरे मला कृपा करून सांगावें.” तेव्हां त्या गणिका म्हणाल्या; शृंगऋषे ! आमच्या आश्रमधर्माविषयीं योग्य रीतीनें माहिती करून देण्यास हैं स्थळ अगदींच अयोग्य आहे, जेथे कोणीहि येणार नाहीं, अशा एखाद्या स्थळीं आपण याल, तर आम्ही आमच्या आश्रमधर्माची आपणास खरीखरी माहिती देऊं. गणिकांनी असे सांगितल्यावर तो शृंगऋषि त्या गणिकांना घेऊन दूर अशा एका निबिड अरण्यांत आला, व तेथे एकांत अशा ठिकाणी बसून त्या गणिकांना त्यांचे आश्रमधर्म विचारूं लागला. तेव्हां एक गणिका शंग- ऋषीच्या सन्निध बसून म्हणाली; "ऋपी ! आमची मुख्य उपासना आलिंगन है। आहे, ज्या देवतेचें आम्ही निरंतर ध्यान करतों ती प्रत्यक्ष लिंगरूपानें प्रगट होते, आमच्या हृदयावर आह्मी या दोन शाळुंका स्थापन केल्या आहेत; ह्यांच्या