पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ कथाकल्पतरु. [ स्तबक राजाला आणण्यासाठी आपल्या दूतांना अंग देशांत पाठवून त्या राजाला मोठ्या सत्कारानें अयोध्येस आणिलें. हा रोमचरण राजा व दशरथ राजा या उभयतांमध्ये अत्यंत स्नेह होता. दशरथ राजाला ऐन तारुण्यांत कौसल्ये- पासून शांता या नांवाची एक मुलगी झाली होती; ती मुलगी मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे दशरथानें रोमचरण राजाला दिली होती. रोमचरणास कांहींच मूलबाळ नसल्यामुळे त्यानें त्या मुलीचा स्वीकार मोठ्या आनंदानें केला व तो त्या मुलीचें लालनपालन जन्मदात्या आईबापाप्रमाणे करीत होता. त्या रोमचरणाला आपल्या घरी बोलावून आणल्यावर दशरथ म्हणाला; राजा रोमचरणा ! आपणास ब्राह्मणांनी असे सांगितले आहे किं, आपण ग ऋषीला आणल्यास त्यांच्याकडून आपले देशांत पाऊस पडून मला पुत्रप्राप्ति होईल. तर हें खरें आहे काय ? " तेव्हां रोमचरण राजा म्हणाला; 66 दशरथ 66 महाराज ! मला ब्राह्मणांनी याप्रमाणे सांगितलें आहे, हें खरें; पण त्या ऋपीला आणावें कसें; हाच मला मोठा विचार पडला आहे; कारण तो ऋष लहानपणापासून अरण्यांत असल्यामुळे त्यास मनुष्याची ओळख नाहीं व मनुष्याचे व्यवहारही माहीत नाहीत; अशी त्या शृंग ऋषीची स्थिति आहे. " हैं ऐकून दशरथ राजाचा सुमंत प्रधान ह्मणाला; त्या ऋपीला आणण्या- साठीं सुंदर व तरुण अशा गणिका पाठवाव्या, म्हणजे तो सहज नगरांत येईल. येथें आल्यावर त्यास रोमपादांनीं पाळलेली दशरथाची कन्या देऊन प्रसन्न करावें, व कार्यभाग साधून घ्यावा. " ती सुमंत प्रधानाची योजना, सर्वांना पसंत पडली, व दशरथानें त्या कामी सुमंताचीच नेमणूक केली; मग सुमंतानें नगरांतल्या चार सुंदर व तरुण गणिका बोलावून आणून त्यांना शृंग ऋषीकडे जाण्यास सांगितलें, व तेथें कशा रीतीनें वागावयाचें तें समजावून दिले. त्याप्रमाणे त्या गणिका उत्तम पोषाख करून, व बरोबर वाद्ये, व पक्कान्नें वगैरे विलासद्रव्ये घेऊन, मार्ग क्रमीत कमीत शृंग ऋषीच्या आश्रमा- जवळ आल्या. आश्रमांत शृंग ऋषि बसला असून त्याच्याजवळ अनेक हरिणें बसली होती. त्या ऋषीला पाहिल्यावर गणिकांनों पायांत नुपुरें बांधिली व वाद्ये वगैरे जुळवून नाचण्यास व गाण्यास आरंभ केला. तो सुंदर नाच पाहून व तें मधुर गाणे ऐकून शृंगऋषि अगदी मुग्ध होऊन गेला; परंतु तो प्रकार त्यानें कधींच पाहिला नसल्यामुळे त्याला तें काय आहे तें बरोबर कळेना. याप्रमाणें ऋषीचे मन आकर्षण करून घेतल्यावर त्या गणिका अगदी ऋषीच्या सन्निध आल्या व त्यांनी ऋषीपुढे पंचपक्कान्नांची ताटें ठेवून ऋषीस नमस्कार केला; तेव्हां शृंगऋषीनें 'नारायण' नामाचा घोष करून त्या चारही गणिकांना सत्काराच्या उद्देशानें आलिंगनें दिली; पण त्या वेळीं हृदयावर गणिकांचे उन्नत व कठिण • स्तन आपटल्यामुळे त्याचें मन भ्रमित झालें. अग्नीवर तूप पडल्यानें तो जसा