पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ३ रा. विभांडक आहे, त्या विभांडकाचा पुत्र शृंगी या नावाचा आहे, त्या श्रृंगी ऋषीला तूं घेऊन आल्यास त्याच्या प्रयत्नामुळे तुझ्या राज्यांत पाऊस पडेल. तसेंच तुझा मित्र जो दशरथ राजा त्यालाही त्या शृंग ऋषीच्या कृपेनें पुत्र होतील. " असें त्या विप्रांनीं रोमचरण राजाला सांगितले आहे. यावरून शृंग ऋषीच्या कृपेनें दशरथ राजाला पुत्र होतील असे वाटतें है त्या सनत्कुमा- रांचें बोलणें मी स्पष्ट ऐकिलें आहे, तेव्हां महाराज ! आपण शृंग ऋषीला आणावे किंवा रोमचरण राजाला बोलावून त्याच्याकडून शृंग ऋषीला बोलवावें.” 66 वैशंपायन ऋषी जनमेजय राजाला याप्रमाणें दशरथ राजाची कथा सांगत असतां, मध्ये शृंग ऋषीचा संबंध आला म्हणून त्या ऋषीची हकीकत ऐकण्याची त्याला इच्छा झाली. ती राजाची इच्छा जाणून वैशंपायन ऋषी राजाला शृंग ऋषीची कथा सांगू लागले. ते म्हणाले, राजा ! विभांडक ऋषी आपल्या दर्भासनावर बसून देवतार्चन वगैरे करीत असतां आश्रमांतील हरिणें मैथुन करूं लागलीं, तो प्रकार पाहून विभांडक ऋषीला कामेच्छा उत्पन्न झाली व त्याचें रेत स्खलन होऊन तें दर्भासनावर पडलें. तेव्हां विभांडक तेथून उठून शुचिर्भूत होण्यासाठी स्नानाला गेला. तो स्नानाला गेल्यावर इकडे एका ऋतुस्नात हरिणीनें तें दर्भासनावर पडलेलें रेत भक्षण केले. त्या रेतापासून ती हरिणी गरोदर झाली व पूर्ण दिवस झाल्यावर ती प्रसूत होऊन तिला मनुष्याप्रमाणें मुलगा झाला. तो विलक्षण प्रकार पाहून विभांडक ऋषीला मोठें आश्चर्य वाटलें, नंतर अंतर दृष्टीने असें होण्याचे कारण काय, तें त्याच्या लक्षांत

  1. आलें. मग त्यानें त्या मुलाचें संरक्षण करून त्याला लहानाचे मोठें केलें.

तो मुलगा कांहींसा मोठा झाल्यावर त्याच्या मस्तकावर एक शिंग उगवलें, त्यावरून विभांडकाने त्याचें नांव शृंग असें ठेविलें. त्या आश्रमांत मनुष्याचा वास नसल्यामुळे त्या शृंग ऋषीचा सर्व वेळ हरिणांबरोबर खेळण्यांत जात असे. शृंगीचें मौंजीबंधन झाल्यावर विभांडकानें त्याला सर्व विद्या शिकविल्या व आपणच त्याचा गुरु होऊन त्याला गुरूपदेश केला. त्या शृंग ऋपीला तारुण्य प्राप्त होईपर्यंत बापावांचून इतर मनुष्याचें दर्शनहि नव्हतें; यामुळे त्याला मनुष्यांचे कित्येक व्यवहार मुळींच माहीत नव्हते. तो ज्या आश्रमांत रहात होता, तेवढेच काय तें जग आहे, अशी त्याची समजूत झाली होती. " अध्याय ३ रा. १ गलंड ऋषीची कथा. सुमंत प्रधानानें दशरथ राजाला बद्रिकाश्रमी ऐकलेली गोष्ट सांगितल्यावर, आपणास पुत्र होतील असा भरंवसा त्याला उत्पन्न झाला, व त्यानें रोमचरण,