पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक पूज्य बुद्धीनें वागून त्याला पित्याप्रमाणे मानीत असे. त्याचें सैन्य सर्वबाजूंनी पूर्ण असून नेहमीं सज असे. त्या राजाची राज्यव्यवस्था अत्यंत व्यवस्थित असून बंदोबस्तासाठीं त्यानें राष्ट्रबर्धन, सिद्धार्थ, धृष्टी, विजय, जयवंत, धर्मपाळ, सुमंत आणि अकोप, असे अष्ट प्रधान नेमिले होते. ते अष्ट प्रधानही राजाप्रमाणेच पापभीरु असून नीतीनें राज्य कारभार करीत असत. या अष्ट प्रधानांसह दशरथ राजा राज्य करीत असतां, एके दिवशीं राजा सहजगत्या आरशांत आपले मुख पाहूं लागला; तो जरेनें झालेले पांढरे केस त्याच्या दृष्टीस पडले. ते केंस पाहून राजा आपल्या मनांत ह्मणाला, हा राज्याचा गाडा हांकतां हांकतां वृद्धावस्था आली, तरी अझून ही राज्यतृष्णा नाहींशी होत नाहीं, हें अत्यंत अनुचित आहे. यावेळी निग्रह करून या भवपाशांतून सुटण्याचा कांहीं तरी प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंतच आत्म्याच्या उद्धाराचा कांहीं तरी प्रयत्न केला पाहिजे. असा विचार करून राजानें आपल्या सर्व प्रधानांनां जवळ बोलाविलें, व त्यानां म्हणाला; “ प्रधानहो ! माझी आतां वृद्धावस्था झाली आहे, तेव्हां हैं राज्य सोडून वानप्रस्थाश्रम ग्रहण करावा, असें मी मनांत आणिलें आहे. तर माझ्या पश्चात या राज्याची कशी व्यवस्था करावयाची याचा तुम्ही चांगला विचार करून मला सांगा." दशरथाचें हे बोलणे ऐकून सर्व प्रधानांची मनें उदास झाली. तेव्हां एक प्रधान म्हणाला; महाराज आपण आजपर्यंत पुष्कळ दानधर्म केला, परंतु पुत्र प्राप्तीसाठी कांहींच प्रयत्न केला नाहीं, तरी विद्वान ब्राह्मण बोलावून त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करवा, म्हणजे आपणास पुत्रप्राप्ति होईल व या सांप्रतच्या काळजीपासून आपण दूर व्हाल. " हैं ऐकून राजा म्हणाला; “ प्रधानहो ! माझ्या दैवांत पुत्र नाहीं असे दिसतें, मग निष्कारण त्यासाठी प्रयत्न करून आयुष्याचे दिवस तरी कां फुकट घालवूं " तेव्हां सुमंतु नावाचा प्रधान म्हणाला; 'महाराज ! मी यात्रेसाठीं बद्रिकाश्रमी गेलों असतां तेथें जो ऋषींचा संवाद ऐकला तो आपणांस सांगतो. " 66 66 ४ हरिणीपासून मनुष्योत्पत्ति. बद्रिकाश्रमांतील कांहीं ऋषींनीं सनत्कुमारास असा प्रश्न केला किं, अयो- ध्येच्या दशरथ राजाला पुत्र कसे होतील ? तेव्हां सनत्कुमार म्हणाले, “ अंग देशचा राजा रोमचरण या नांवाचा आहे, तो अत्यंत उदार असून धर्मकर्मासंबंधानें राजऋषि आहे, परंतु त्या राजाच्या देशांत बारा वर्षे अवर्षण पडल्यामुळे त्याचा देश उद्वस्त होऊन लोक अन्नावांचून मरू लागले; तेव्हां तो राजा ब्राह्मणांकडे जाऊन त्यांना म्हणाला; "विप्रहो ! माझ्या राज्यांत बारा वर्षे पाऊस नाहीं, तरी पर्जन्य पडण्यासाठी काय करावें तें मला सांगा.. " त्या वेळी एक ब्राह्मण राजाला म्हणाला; राजा ! कश्यप ऋषीचा पुत्र १० 66 कथाकल्पतरु.