पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा.] अध्याय २ रा. व बकदाल्भ्य ऋषि बरोबर असलेल्या शिष्यांनां घेऊन यात्रेला निघून गेले. पुढें ते ऋषि यात्रा करून साठ वर्षांनी त्याच मार्गानें परत येत असतां, त्यांनीं जथे वाल्या कोळ्याला उपदेश केला होता, तेथें त्यांच्या दृष्टीस एक मोठे वारुळ पडलें. त्या वारुळांतून मंत्रध्वनि येत आहे हे पाहून सर्वांनां मोठें आश्चर्य वाटलें. मग त्यांनीं तें वारुळ खणून काढलें, तों आंत पूर्वीचा वाल्या कोळी बकदाल्भ्यानीं सांगितल्याप्रमाणे जप करीत बसला आहे, असे सर्वांनां आढळून आलें. त्या तपाच्या सामर्थ्यामुळे त्याची अंगकांती वगैरे सर्वच बदललें होतें. किड्याचा जसा भ्रमर होतो, अथवा सोनें अग्नींत घातलें असतां जसें अधिक सतेज होतें, त्याप्रमाणे त्या वाल्याचे शरीरावर तपाचें तेज दिसत होतें. मग सर्व ऋषींनी त्यास त्या मृत्तिकेंतून बाहेर काढलें, व त्याला अभिषेक करून गायत्री मंत्राचा व चारही वेदांचा अधिकार दिला, आणि त्याचें नाव वाल्मीकि ऋषि असें ठेविलें. पुढे त्या वाल्मीकीनें रामजन्माच्या अगोदरच रामायण लिहिलें. अशा वाल्मीकीची थोरवी वर्णन करणें कठिण होय. "> ३ दशरथराजाची पुत्रविवंचना. 66 राजा जनमेजया ! कोसल देशामध्ये शरयू नांवाच्या पवित्र नदीतिरावर अयोध्या या नावाची एक अत्यंत विस्तीर्ण व सुंदर अशी नगरी आहे. त्या अयोध्येमध्यें पूर्वी अज या नावाचा राजा राज्य करीत होता. पुढें तो राजा निवर्तल्यानंतर त्या अजराजाचा पुत्र दशरथ राजा राज्य करूं लागला. तो •दशरथ राजा चक्रवर्ती होता, त्याची राजधानी अयोध्या ही त्याच्या वेळी बारा योजनें विस्तीर्ण होती. त्या नगराचें वर्णन करण्यास सहस्रमुखी शेषहि असम आहे, मग इतरांचा पाड तो काय ? त्या रम्य व पवित्र नगरीचें दर्शन व्हावें झणून शेष लक्ष्मणाचा अवतार घेऊन आला, व प्रभु श्रीरामचंद्राचा अवतार घेऊन बैकुंठाहून तेथे आले. यावरून ती अयोध्या वैकुंठाहूनहि सुंदर, रम्य, पवित्र व मोठी होती, असे वाटतें. ती नगरी रामचंद्राच्या वास्तव्यानें पुढे अधिक नावारूपाला आली होती. त्यांच्या वास्तव्यापूर्वी ती विस्तृत नगरी अगदी कलाहीन दिसत होती. स्त्रियांनां पतीवांचून जसे अलंकार शोभत नाहींत, किंवा शालिग्रामावांचून संपुष्टाला शोभा नाही, अथवा कोकिळ- खावांचून वसंत जसा बहारदार वाटत नाहीं, याप्रमाणे श्रीरामचंद्रावांचून अयोध्या नगरी रजस्वला स्त्रियेप्रमाणे दिसत होती; जप ते त्या नगरीचें औदासिन्य प्रभूनी लवकरच नाहींसें केलें. दशरथराजा हा महापराक्रमी असून त्यानें आपल्या बाहुबलानें चक्रवतीं हैं पद मिळविले होतें. संपूर्ण पृथ्वीवरील राजांनां त्यानें आपले मांडलिक केले होते, तो राजा अत्यंत उदार असून दानशील होता, तो सर्व विद्यांत निपुण असून पुत्राप्रमाणें प्रजेचें पालन करीत असे. त्याची प्रजाही त्याच्याविषयी