पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक चुडवूं लागला; परंतु त्या वेळीं रोहिदास तेथें जवळच होता. त्याच्या लक्षांत ती गोष्ट आल्याबरोबर त्यानें पाण्यांत अग्निबाण सोडून आपल्या बापाची सुटका केली व वरुणाला तेथून पळवून लावलें. पुढे मग हरिश्चंद्र राजानें अजीगर्त नांवाच्या एका ब्राह्मणाचा मुलगा त्या अजीगर्तापासून विकत घेऊन वरुणाला दिला व त्याला संतोपित केलें. देवेंद्रा, या हरिश्चंद्र राजाप्रमाणे या वेळी तूंहि युक्तनेिंच आपला कार्यभाग साधून घे व या संकटाचें निवारण कर. तुह्मां दोघांचा पिता कश्यपऋषि आहे, तो मोठा विचारी असून तो त्या वज्रनाभाची समजूत चांगल्या रीतीनें करील; तर तूं त्या वज्रनाभाला घेऊन कश्यपऋषीकडे जा, ह्मणजे या आलेल्या संकटाचें निवारण चांगल्या रीतीने होईल. " कथाकल्पतरू. वैशंपायनऋषि, जनमेजय राजाला ह्मणतात; हे राजा जनमेजया, आतां मूळ कथेकडे लक्ष दे. बृहस्पतीनें इंद्राला याप्रमाणे सांगितल्यावर इंद्राला ते देवगुरूचें झणणें पसंत पडलें, व त्यानें वज्रनाभास तो आपला विचार कळवून बोलावून आणलें. नंतर ते दोघेहि कश्यपऋपीच्या आश्रमांत आले व कश्यपऋपीला व आपआपल्या मातांनां वंदन करून त्यांनी सर्व हकीकत कश्यपास निवेदन केली. तेव्हां कश्यपासहि काय करावें याचा मोठा विचार पडला; कारण ते दोघेहि त्याचे पुत्र असल्यामुळे त्यांचें मन दुखविणें त्यास कठीण वाटू लागले. मग तो त्या दोघांनां म्हणाला; पुत्रहो हल्ली मी ही यज़दीक्षा घेतलेली असून यज्ञ यागाला आरंभ केला आहे, तर या वेळी या गोष्टीचा विचार मला करितां येत नाहीं, म्हणून तुम्ही दोघेहि माझा हा यज्ञ पूर्ण होईपर्यंत स्वस्थ आपआपले राज्यांत जाऊन रहा. यज्ञ समाप्तीनंतर तुह्मां दोघांचें हें भांडण मिटवून टाकीन " बापाची ही आशा वज्रनाभ व इंद्र या दोघांनीहि मान्य केली व ते तेथून निघून गेले. वज्रनाभाला अमरावती घेण्याची मोठी उत्कंठा लागल्यामुळे त्यास तो यज्ञकाल केव्हां संपेल असे वाटत होतें, व देवेंद्राला त्या यज्ञकाली साहजिक स्वस्थता प्राप्त होऊन त्याला समाधान वाटत होतें. G ४ प्रभावती व पार्वती. वज्रनाभराजा वज्रपुरीस परत आल्यावर त्यानें घडलेली सर्व हकीकत आपला बंधु जो मुनाभ त्यास सांगितली, व ते दोघेहि यज्ञसमाप्तीची वाट पहात बसले.. यासुमारास वज्रनाभाची मुलगी प्रभावती, उपवर झाल्यामुळे राजाला तिच्या लग्नाची फार काळजी लागली होती. ती मुलगी फार सद्गुणी असून अत्यंत सुस्वरूप होती. त्या वज्रनाभाला तेवढेंच एक अपत्य असल्यामुळे त्याचें त्या मुलीवर फार प्रेम होतें. वज्रनाभाची स्त्री सुशीला म्हणून होती, तिला तर ती आपली मुलगी प्राणापेक्षांहि अधिक प्रिय वाटत असे. सुशीलेला पुष्कळ दिवसपर्यंत मुलबाळ नव्हते हाणून तिला स्त्रियांच्या स्वभावधर्माप्रमाणे फार वाईट वाटत असे. तिनें आपणास संतति व्हावी ह्मणून पार्वतीची फार दिवसपर्यंत एकनिष्टपणें सेवा