पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा.] "अध्याय २ रा. लागला. राजा जनभेजया ! याप्रमाणे रामायण लिहिण्यास आरंभ केल्यावर, वाल्मीकीच्या अंतःकरणांतली तळमळ नाहींशी झाली व त्या कार्यातच तो व त्याचे शिष्य तल्लीन होऊन गेले. वाल्मीकिऋषि दूरदृष्टीनें भावी का ळाकडे दृष्टि देऊन मजकूर सांगे व तो भारद्वाज लिहून घेई. अशा रीतीनें वाल्मीकिऋषीनेंहि शंभर कोटि श्लोक रामचरित्राविषयीं भारद्वाजाला सांगितले. २ वाल्मीकि ऋषीची कथा. वैशंपायन हाणाले " हे जनमेजय राजा ! ज्या वाल्मीकिऋपचे अंग एवढे सामर्थ्य होतें, किं राम जन्मास येण्याचे पूर्वीच त्यानें समग्र रामायण लिहून काढले त्या पुण्यपावन ऋषचेिं चरित्र ऐकण्याची तुला साहजिक इच्छा झाली असेल, झणून त्या वाल्मीकि ऋषीची हकीकत तुला संक्षेपानें सांगतो. राजा ! ज्या वाल्मीकीला लोक ऋषि ऋषि ह्मणून अत्यंत वंद्य मानतात, तो वाल्मीकि पूर्वी वाल्या या नावाचा हीन कोळी जातींतील होता, तो जातीनेंच हीन होता असें नाहीं, तर मनानेंहि अत्यंत निर्दय व बुद्धीनें विलक्षण दुष्ट असा होता. तो केवळ पशु व पक्ष्यानांच मारून आपलें उपजीवन करित होता असें नाहीं, तर मनुष्यांनाहि मारून त्यांचें द्रव्य हरण करित असे व त्या द्रव्यानें आपल्या मुलामाणसांचे संरक्षण करीत असे. याप्रमाणे त्या वाल्या कोळ्याचा कित्येक वर्षे सारखा क्रम चालल्यामुळे त्याच्या हातानें अनंत मनु- व्यांचे खून झाले होते. यासंबंधानें अशी दंतकथा आहे किं तो प्रत्यहीं जितक्या माणसांना मारी, तितके खडे तो रांजणांत टाकित असे, एक रांजण भरल्यावर दुसरा, दुसरा भरल्यावर तिसरा, असे त्यानें कित्येक रांजण खड्यांनीं भरून ठेविले होते. असा त्या वाल्या कोळ्याचा क्रम चालला असतां, एके दिवशीं त्या रस्त्यानें बकदाल्भ्य ऋषि जात होते. त्या ऋषींनां अडवून वाल्याने त्यांच्यावर बाण रोंखला, व जवळ काय आहे तें सर्वमाझ्या स्वाधीन कर हाणून त्या ऋषीला सांगितलें, तो प्रकार पाहून बकदाल्भ्य ऋषि अत्यंत चकित होऊन गेले, ते त्या कोळ्याला ह्मणाले; वाल्या ! मला मारून तुला ● काय मिळावयाचें आहे, मजजवळ कौपीन ( नेसावयाची लंगोटी ), पूजेचा शालिग्राम आणि भीक मागावयाची करवंटी एवढेच काय तें आहे. या वस्तूंनी तुझें कोणतेंहि कार्य होण्यासाखें नाहीं, आणि तूं इतरांनां मारून त्यांच्या जवळचें धान्य, द्रव्य, सोनें, पुस्तकें, वस्त्रे, पशु, वगैरे हरण करितोस, त्यापासूनहि तुझा कांहीं फायदा नाहीं. कारण या वस्तु चोरणारांनां सहस्र वर्षे नरकवास भोगावा लागतो, जीवहिंसा करणारांनां अनंत गर्भवास भोगावे लागतात, आणि ही सर्व दुःग्चें तुला एकट्यालाच भोगावी लागतील, तूं हीं नीच कृत्यें करून स्वतःचेंच उपजीवन करित आहेस असें नाहीं, तर तूं आपली बायको, मुलें या सर्वांचे संर क्षण करित आहेस, परंतु तीं या तुझ्या पातकाला मुळीच भागीदार नाहीत,