पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक प्रजेचें तो पुत्राप्रमाणें पालन करील. वाल्मीके ! त्या श्रीरामचंद्र प्रभूचें चरित्र लिहिण्यास मला वाटतें मी अगदीच असमर्थ आहे. याप्रमाणे पुढे होणाऱ्या श्रीरामचंद्राची त्रोटक माहिती वाल्मीकीला सांगून नारद भ्रमण करण्यास गेला. कथाकल्पतरु., नारद गेल्यानंतर वाल्मीकिऋषि, भारद्वाज व सुमंतु, यांनां बरोबर घेऊन शरयू नदीवर स्नानासाठी आले. स्नान करून संध्या ब्रह्मयज्ञ वगैरे नित्य कर्मे आटोपून तिघेहि आश्रमांत परत येत असतां एका वृक्षावर वसलेला एक सुंदर क्रौंच पक्ष्यांचा जोडा त्यांच्या दृष्टीस पडला. त्या पक्ष्यांच्या लीला पाहून तिघांनांहि मोठी मौज वाटली, परंतु इतक्यांत एका दुष्ट पारध्यानें एक बाण त्या पक्ष्यांच्या जोड्याला मारून त्या क्रौंच पक्ष्यांतील नराला खाली पाडलें, तें शोचनीय दृश्य पाहून त्या तिघांनांहि अत्यंत वाईट वाटलें. विशेषतः त्या वेळी त्या क्रौंच मादीचा आपल्या पतीसाठी चाललेला विलाप ऐकून वाल्मीकि ऋषीचें अंत:- करण करपून गेले. त्याला त्या क्रूर पारध्याचा अत्यंत राग आला, तो त्या पार ध्याकडे रागानें पाहून म्हणाला. मां निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वतीः समाः ।। यत्क्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥ १ ॥ ‘ निर्दया पारध्या ! त्या सुखी क्रौंच पक्ष्याला मारून त्याच्या स्त्रियेला विपत्तीत लोटलेंस या पातकाबद्दल तूं शंभर वर्षे नरकयातना भोगशील.' असें वाल्मीकि ऋषि, रागानें त्या पारध्याला म्हणाला, परंतु त्या पारध्याला त्याबद्दल कांहीं एक वाईट न वाटतां तो त्या मृतक्रौंच पक्ष्याचे पाय आपल्या हातांत धरून वाल्मीकि समोरून निघून गेला. ती मृतपक्ष्याची विटंबना पाहून वाल्मीकि ऋपीला अधिक वाईट वाटलें, व तो तेथून निघून आपल्या आश्रमांत आला. आश्रमांत आल्यावर तो आपल्या शिष्यांबरोबर अनेक शास्त्रांवर रोजच्या नियमाप्रमाणे चर्चा करित बसला, पण त्या क्रौंचपक्ष्याचा दुःखकारक देखावा हृदयांत घोळत असल्यामुळे त्याचें चित्त त्या शास्त्रचर्चेकडे लागेना; ध्यानस्थ बसून पाहिलें, तरी तेच विचार अंतःकरणांत येऊं लागले. अन्य ठिकाणीं मन गुंतविण्याचा त्यानें बरेच वेळां प्रयत्न केला, परंतु मनांत वारंवार त्या क्रौंचपक्ष्याची गोष्ट येऊन, तें पारध्याचें कृत्य दृष्टीपुढे दिसूं लागे, हाणून वाल्मीकि ऋषीनें नारदानें सांगितलेल्या शतश्लोकी रामायणावरून संपूर्ण रामायण लिहिण्याचें मनांत आणिलें, मग त्यानें भारद्वाजास आपणाजवळ कागद, दऊत, लेखणी घेऊन लिहिण्यासाठी बसविलें व आपण मजकूर सांगू , १ या श्लोकाचे तीन चार अर्थ निषादपर व रामपर असे रामायणाचे टीकेत केले आहेत.