पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक अव्यक्त ह्मणजे हिरण्यगभ स्वरूपाची ओळख करून देणें यास सर्ग लक्षण असें ह्मणतात, विराट स्वरूपाविषयीं विवेचन करणे यास प्रतिसर्ग लक्षण असें ह्मणतात, पंचभूतांचा विचार करणे यास वंशलक्षण असें ह्मणतात, ब्रह्मदेवापासून स्वायंभुवादि जे चौदा मनु झाले त्यांच्याविषयींच्या उहापोहाला मन्वंतर लक्षण असे ह्मणतात, सोमापासून व सूर्यापासून जे वंश निर्माण झाले आहेत त्यांचा इतिहास ग्रथित करणे आणि सत्पुरुषांच्या व राजांच्या कथा वगैरे चांगल्या बुद्धीनें लिहिणं, यांस वंशानु चरित लक्षण असे ह्मणतात. याशिवाय नाना प्रकारचे अवतार धारण करून लोकांचें पालन करणे, सर्व जीवांच्या जीवनाचे उपाय उत्पन्न करणे, प्रलय काली सर्वांचा संहार करणे, मी जीव आहे अर्थात् किंचिश आहे व स्वतःविषयी आणि परक्याविषयीं न्यायबुद्धि अशीं आणखीं पांच उपलक्षणें आहेत. एकूण पुराणांची दहा लक्षणे आहेत. या लक्षणांनी कथेचें सार काढून तें ग्रहण करावें अशी नीति आहे. गुणी लोक जशी उसाच्या रसापासून साखर घेतात किंवा दुधापासून नवनीत घेतात, त्याप्रमाणे कथेतील ग्राह्यांश तेवढा घ्यावा. हे साधुसंत जनहो ! मीहि माझ्या या ग्रंथासंबंधानें तुझांला हीच विनंति करून हें मंगलाचरण पुरे करितों. अध्याय २ रा. १ क्रौंचपक्षी व रामायण. 66 जनमेजय राजा वैशंपायन ऋषीला ह्मणाला; “ मुनिवर्य ! या भूमंडळावर सर्वगुणसंपन्न, शीलवंत, दयाळू, उदार, सत्यवचनी, विरक्त, दुष्टांचें हनन व साधूचें संरक्षण करणारा, पितृभक्त, एकपत्नी, असा कोणी सज्जन पुरुष होऊन गेला असल्यास त्याचें चरित्र आपणाकडून ऐकावें अशी माझी इच्छा आहे. " जनमेजय राजाचें असे भाषण ऐकून वैशंपायन ऋषि ह्मणाले; राजा ! तूं झणतोस त्याप्रमाणें उदारचीरत्र, एकपत्नी, एकवचनी, एकबाणी, असा सूर्यवंशी क्षत्रियकुलावंतस राजाधिराज श्रीरामचंद्र होऊन गेला आहे. या संपूर्ण पृथ्वीवरच काय, परंतु तीनही लोकांत श्रीरामचंद्राप्रमाणे पुत्रवत् प्रजेचें पालन करणारा राजा झाला नाहीं, आणि पुढेहि होणार नाहीं. श्रीरामचंद्राच्या चरि- त्राचा महिमा जितका वर्णावा तितका थोडाच आहे. शंकरासारखे देवहि हालाहल विषापासून होणाऱ्या दाहाची शांति होण्याकरितां ज्या रामाच्या नावाचा अहर्निश जप करितात, असें तें रामचंद्राचें नुसतें नावहि इतकें