पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३रा. ] अध्याय १ ला. हरिकथा भवभयव्यथा दूर करणारी असल्यामुळे तिचें मनन तुझीं प्रेमानें व भक्तीनें करा. मी ह्या कथा जर माझ्या कीर्तीसाठी लिहित नाहीं; तर तुलीं माझ्या दोषाकडे तरी दृष्टि कशाला देतां ? मुख्य गोष्टीवर नजर देऊन परमे- श्वराच्या नामामृताचें पान करा ह्मणजे झालें. जर मजकडून कांहीं दोप झाले असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा, मी क्षमेला सर्वस्वी पात्र आहे; कारण केवळ परमेश्वराच्या गुणांचें कथन करावें, या दृष्टीनेंच मी हा ग्रंथ लिहित आहे. त्यांत आत्मश्लाघता कांहींहि नाहीं. मला विद्वत्तेचा डौल नाहीं व कीतींची अभिलाप नाहीं. या वाक्पुष्पांच्या हारांत मी अठराहि पुराणांतली सुमनें गुंफिलीं आहेत. तसेंच रामायण, भारत, वेद, श्रुति, स्मृति वगैरे परम वंद्य ग्रंथांतील कथारूप सुमनेही यथा- वकाश गुंफिलीं आहेत. हा हार तुम्हांस मनोरम वाटेल यांत कांहीं शंका नाहीं, पुराणें किती आहेत व त्यांची ग्रंथसंख्या किती आहे, हे मी आतां तुम्हांस संक्षे- पानें सांगतों. ब्राह्मं पाद्मं वैष्णवं च शैवं लैंगं सगारुडम् || नारदीयं भागवतमाग्नेयं स्कंदसंज्ञितम् ॥ १ ॥ भविष्यं ब्रह्मवैवर्त मार्केडेयं सवामनम् ॥ वाराहं मात्स्यं कौमैच ब्रह्मांडाख्यमिति त्रिपट् ॥ २ ॥ → ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, लिंग, गरुड, नारद, भागवत, अग्नि, स्कन्द, भविष्य, ब्रह्मवैवर्त,मार्कण्डेय, वामन, वराह, मत्स्य, कूर्म व ब्रह्मांड अशीं अठरा पुराणे आहेत. त्यांची संख्या अशी आहे किं, ब्रह्म पुराण दहा हजार, पद्मपुराण पंचावन हजार, विष्णु पुराण तेवीस हजार, शिव पुराण चोवीस हजार, नारद पुराण पंच- वीस हजार, भागवत अठरा हजार, मार्कण्डेय व अग्नि पुराण पंधरा हजार चारशें, भविष्योत्तर पुराण चोवीस हजार पांचशें, ब्रह्मवैवर्त अठरा हजार, लिंग पुराण अकरा हजार, वराह पुराण चोवीस हजार, स्कंद पुराण एक्या- ऐशी हजार शंभर, वामन पुराण दहा हजार, कूर्म पुराण सतरा हजार, मत्स्य पुराण चौदा हजार, ब्रह्मांड पुराण बारा हजार व गरुड पुराण एको- णीस हजार आहे. अठरा पुराणांची एकंदर ग्रंथसंख्या चार लक्ष सोळा हजार चारशें इतकी आहे. या सर्वांचें सार काढून मी हा कथा- कल्पतरु ग्रंथ तयार करीत आहे. पुराणाची लक्षणे व उपलक्षणे मिळून एकंदर दह लक्षणे आहेत, त्यांपैकी पांच लक्षणे आहेत, तीं हीं कि- सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च ॥ वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणं ॥ १ ॥