पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तंबक असून ब्रह्मांडापासून अलिप्त आहेस. तूं जीवनाचें जीवन असून ज्ञाननेत्रांना अंजन स्वरूप आहेस. मोह हा तूंच असून वेदाचें ज्ञानरूप अंजनही तूंच आहेस. हे कृपावंता! हे भक्तवत्सला ! हे महाशीला ! हे धर्मश्रुतीच्या प्रतिपालका ! हे गोविंदा ! तूं मनाला बंधापासून सोडविणारा असून तत्वमत्स्यादि वाक्यांच्या ज्ञानाचें साधनही तूंच आहेस. हे अनाथनाथा ! हे अनंता ! तुझी स्तुति मी अज्ञान पामराने काय करावयाची आहे ? आकाश मोजावयाला कोणतेही माप जसे अपुरें आहे, त्याप्रमाणे तुझी स्तुति करावयाला कोणतेही शब्द अपुरे आहेत. चार मुखांचा ब्रह्मदेवही तुझी स्तुति करण्यास असमर्थ आहे, तर मी अज्ञानी पामरानें तुझे गुण वर्णन कसे करणार, तसेंच जी कांहीं थोडी तुझी स्तुति केली आहे, ती तरी यथासंगत आहे, असा मला कोटें भरंवसा आहे ? परंतु हे कृपानिधे! आपल्या मुलाचे बोबडे बोल मातेला जसे कौतुकप्रद वाटतात; त्या प्रमाणे या दीन लेकराचे अर्धवट वोल तुला आवडतील असा मला भरंवसा आहे. कथाकल्पतरु. हे अनंता ! मातृपितृ स्वरूप असून ब्रह्मकुलाची देवताही तूंच आहेस. तूंच गणा- धीश गुरु व श्रोता वक्ताहि तूंच आहेस. अंतःकरणपूर्वक तुझें स्तवन केले असतां तूं सर्व विघ्नांचा नाश करून कार्य पूर्ण करितोस, झाडाच्या मुळाशी घातलेले जीवन जसें शाखांचें, पल्लवांचें, पुष्पाचें व फळांचें संरक्षण करितें, त्याप्रमाणे तुझें स्तवन केलें असतां; सहज सर्वोची कृपा संपादितां येते. हे सर्वज्ञ चिंतामणी ! तुला माझी एवढीच विनंति आहे कीं, तूं माझ्या अंतःकरणांत प्रवेश करून, जसा बाण लक्ष्यावर जातो, जसा धूर्त मनुष्य दुसऱ्याचें वर्म काढतो, तसा तूं माझ्या मुखानें या तिसऱ्या स्तबकाचें खरें हृद्गत काढ. जसा डोळस मनुष्य आंधळ्याला मार्ग दाखवितो, किंवा जसें सूत्र घोट्याच्या मागे धावतें, त्याप्रमाणें तूं मला मार्ग दाखीव, ह्मणजे भी त्या मार्गानें जाईन. मला काव्य- स्फूर्ती दे, हाणजे मी तुझे गुणानुवाद गाईन. मला ज्ञानदृष्टि दे, ह्मणजे मी तुझ्या स्वरूपाची ओळख श्रोत्यांस करून देईन. माझ्या हातानें या कथाकल्प- तरु, ग्रंथाचे दोन स्तबक पूर्ण झाले; ही केवळ तुझी कृपा होय. अशीच जर तुझी कृपा राहील, तर हा ग्रंथ मी सहज पूर्ण करीन. हे प्रभो ! आतां मी या तिसऱ्या स्तबकाला आरंभ केला आहे, तो तूं मला काव्यस्फूर्ति देऊन रस- भरीत कर. श्रोते जनहो ! आपण ह्या श्रीहरीच्या कथांचें प्रेमानें श्रवण पटण करित आहां, हे पाहून मला फार समाधान वाटत आहे. श्रोतेजनांत कांहीं मूढ असतील, कांहीं ज्ञाते असतील, परंतु मला ते सर्व सारखेच प्रिय आहेत. कारण जे ज्ञाते आहेत ते ज्ञानदृष्टीने या कथांचें मनन करितील व जे मूढ आहेत ते धोपट मार्गाने व श्रद्धाळूपणे ह्या कथा वाचतील; सारांश दोघांचें कार्य एकच आहे, तेव्हां मला दोघेहि प्रिय वाटणे साहजिक आहे. श्रोतेजनहो ! ही