पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. 30408506 स्तबक ३ रा. अध्याय १ ला. मंगलाचरण. यं ब्रह्म वेदांतविदो वदंति, परं प्रधानं पुरुषं तथान्ये ।। विश्वोद्भवं कारणमीश्वरं वा, तस्मै नमो विघ्नविनाशकाय ॥ १ ॥ वसुदेवसुतं देवं कंसचाणूर मर्दनं ।। देवकीपरमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ||२|| स्पर्श, स्थूल,. हे त्रिगुणातीता ! त्रिलोकपूर्णा ! शुद्धबुद्धसत्वगुणा ! व शुद्ध स्वरूप नारायणा ! तुला मी अनन्यभावें शरण येऊन साष्टांग नमस्कार करितों. हे अनंता ! तूं कार्य, कारण व कर्ता असून, भोज्य, भोजन व भोक्ता तूंच आहेस. तूं सगुण (मायोपहित चैतन्य ) व निर्गुण ( ब्रह्मस्वरूप ) तूंच आहेस. हे सच्चिदानंदा ! दयाघना ! त्रिगुणगुणांतले कांचन ( तत्व ) तो तूं असून प्रळयकाळचें जीवनहि तूंच आहेस. हे परमहंसा ! हे परमपुरुषा ! हे महाभागा ! हे हृदयकमलांतील बीजांशा ! तुझा जयजयकार असो. हे अव्यक्ता ! आदिअंकुर अधरा ! हे परात्पर जोतिर्लिंगा ! तुझा जयजयकार असो. हे विश्वेश्वरा ! तुझ्या स्वरूपाचें चित्र काढण्यास मी पामर अगदीं असमर्थ आहे. हे महापुरुषा ! तूं शब्द, सूक्ष्म व गंधहि नसून पूर्णरस परमहंस आहेस. हे जगदाभासा ! हे ओंकारप्रकाशा ! हे ब्रह्माधीशा ! हे अनंता ! तूं पर असून परमानंद आहेस. हे विश्वकंद परमात्म्या ! तूं जाणण्याला अशक्य असून अभेद्यही आहेस. तूं प्रलयकालाचे अगोदर असून अतींहि पण आहेस. हे निरंतरा ! तूं सर्व देवांमध्ये उदधि (मेघ) अर्थात् वृष्टि करून अन्न देणारा अथवा उदधि ( समुद्र ) अर्थात् सर्व तीर्थाच स्वरूप अथवा अंतरहित असून सर्व जगताच्या रचनेला कारणही तूंच आहेस.. तूं सर्वज्ञ व त्वंपदबुद्धि असून तूं ज्ञानविधि ह्मणजे उपनिषद्रूप आहेस. तूं हे सर्व चराचर व्यापून पुन्हां अलिप्त असा आहेस. कमळाचें पान जसे पाण्यांत असूनही पाण्यापासून अलिप्त असतें, त्याप्रमाणें तूं सर्व ब्रह्मांडांत •