पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रं. ] अध्याय १७ वा. १७३ 6 जोडून घेतल्यावर तुह्याला स्वर्गाचें राज्य मिळणे कधींच शक्य नाहीं, असो. झालें तें झालें, आतां तरी हा याग बंद करा आणि पुढे प्राणिहिंसा करूंरूं नका, • नाहींतर स्वर्गाचें सिंहासन तर मिळणार नाहींच, पण भयंकर नरकाचे मात्र अधिकारी व्हाल. यत्र जीवो शिस्तत्र ' असें वचन आहे, तेव्हां सर्व प्राणि- मात्र शिवस्वरूप आहेत, त्यांचा वध करणें हें निश्चयाने नरकाची सामग्री आहे. शरीर हैं एक कमल असून त्या कमलामध्यें आत्मा हा दिव्याप्रमाणे आहे, आत्मा हा अविनाशी आहे हें खरें, परंतु शरीराच्या नाशानें त्यालाहि त्रास होतो, म्हणून हिंसा करणारास नरक प्राप्त होतो. राक्षसहो ! तुम्हीं या शुक्राचार्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन हा यज्ञ करीत आहां, परंतु हे भयंकर पाप असून तें या शुक्राचार्याच्या अज्ञानपणामुळे तुम्हीं जोडून घेत अहां. याच्या सांगण्यावरून तुम्हीं आपला कुळाचार कुळधर्म सोडून देऊन भलतेंच कृत्य करीत अहां, तुम्हीं राक्षस महा पराक्रमी असतां तुम्हांस असा यज्ञयाग करण्याची काय अवश्य- कता आहे ? तुम्हीं युद्ध कराल तर तेव्हांच स्वर्ग मिळवाल, मग हा असा क्षुद्र यज्ञ करून निष्कारण पाप कां जोडून घेतां ! " ● भगवंताचें तें वोलणें राक्षसांनां खरें वाटले व त्यांनीं तो यज्ञ बंद करून त्या नवीन श्रावकधर्माची दिक्षा त्या परमहंस स्वरूपी भगवंताकडून घेतली. त्या श्रावकधर्माचें अहिंसा हें मुख्य तत्त्व असून त्यांच्या अरिहंत वगैरे चौवीस देवता आहेत, आणि त्यांच्या चवदा शाखा आहेत. याप्रमाणें भगवंतानें राक्षसांना श्रावक धर्माची दिक्षा देऊन त्या याग समयीं देवांवर आलेले संकट निवारण केलें. त्या संकटाचें निवारण भगवंतानी बुद्धीनें म्हणजे युद्ध वगैरे न करितां केलें म्हणून त्या अवतारास बौद्ध अवतार असे म्हणतात, " दुसरें स्तबक संपूर्ण.