पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ [ स्तबक नंतर वस्त्रे काढून टाकून नग्न झाले. विष्णूनें पायांत पुष्पांच्या पादुका घातल्या व गवत किंवा पाणी याला पाय न लावतां, ते हळू हळू अत्यंत काळजीनें पावले टाकीत टाकीत चालू लागला, मोराच्या पिसांचा कुंचा तयार करून त्यानें हाती घेतला व पुढील भूमि अगोदर झटकावी आणि पाऊल टाकावें, अशा क्रमानें भगवान् विष्णु राक्षसांच्या यज्ञमंडपाकडे येऊ लागला. आकाशांतील अदृष्ट रेणु हेहि जीव धारण करणारे आहेत, तेव्हां त्यांचा शरीरस्पर्शानें नाश होऊं नये ह्मणून मोरांच्या पिसांनी त्याने आपले शरीरही झांकून घेतलें होतें, बरोबर देवांनां शिष्य ह्मणून घेतले होतें, तेहि सर्व हिंसाभयास्तव मोराचीं पिसें गुंडाळून आले होते. याप्रमाणे हा सर्व मेळा मोराच्या पिसांनी रस्ता झाडीत झाडीत यज्ञमंडपांत आला. कथाकल्पतरु. तो दिगंबर अवस्थेतील परमहंसाचा मेळा यज्ञमंडपांत आल्यावर, राक्षसांना मोठें आश्चर्य वाटलें. ते त्या दिगंबररूपी भगवानास म्हणाले, "हे परमहंसा ! या दर्भासनावर बैस, आणि तूं कोण आहेस, हा मोराच्या पिसांचा कुंचा अंगाभोंवतीं कां फिरवित आहेस, पायांत पुष्पांच्या पादुका कां घातल्या आहेस, तें सर्व आह्मांस सांग. तेव्हां भगवान् दर्भासनाचा अनादर करून ह्मणाले, " आकाशांत अनंत जीव आहेत ते डोळ्यास अगोचर आहेत, त्या जीवांची हिंसा होऊं नये ह्मणून त्या जीवजंतूंना या पिसाऱ्यानें शरिरापासून मी दूर करतों, तसेच भूमीवरहि अनंत सूक्ष्म प्राणी आहेत, त्यांचीहि प्राणहानी होऊं नये झणून पायांत या पुष्पांच्या पादुका घातल्या आहेत." असे सांगून भगवंतानें मोराच्या पिसाऱ्यानें जमीन झाडली व तो खाली बसला. नंतर पाणी गाळून घेऊन त्या पाण्यानें त्यानें आचमन केले व तो दैत्यांना ह्मणाला; "असुर हो! हा तुझीं कसला होम करीत आहां व याची फलश्रुती काय ? ते मला सांगा. " तेव्हां दैत्यगुरु शुक्राचार्य ह्मणाला. 'याला याग असें ह्मणतात, वेदांच्या श्रुतीप्रमाणे हा आम्ही करित आहों, यांत पशूंच्या मांसाचे हवन केल्यास तें अवदान देवांनां पावतें, आणि मग देवलोकींचें सिंहासन सहज प्राप्त होते." हे ऐकून भगवंतानें आपले डोळे झांकले व दीर्घ श्वास सोडून तो ह्मणाला; “ अहो; हा तर तुझीं मोटा अधर्म करीत आहां; जीवहत्येविषयीं नुसतें बोलण्यानें देखील नरक प्रातः होतो मग प्रत्यक्ष हिंसा केल्याने किती अधःपात होत असेल ? जो प्राणी हिंसा करतो, तो सहस्र जन्म मासा होऊन त्या अपराधाची फळे भोगतो, किंवा पतंग होऊन दिव्यावर पडतो, आणि पुनःपुनः त्याला याचप्रमाणे नरकयातना भोगाव्या लागतात. तेव्हां तुझीं हा याग करून पुण्य जोडावयाच्या ऐवजी पाप मात्र संपादन करीत आहांत. जरी कोणाकडून नकळत हिंसा झाली तरी त्याला मुद्धां प्रायश्चित नाहीं, मग जाणून बुजून हिंसा करणारांनां तर त्यांतून सुटावयाला कांहींच मार्ग नाहीं. असे भयंकर पापकर्म 66