पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A अध्याय १७ रा. २ राक्षसांचे एक लक्ष योग. 2 वैशंपायन ऋषि ह्मणाले, हे राजा ! आतां तुला बौद्ध अवताराची कथा सांगतो. 'एकदां पाताळांत सर्व राक्षस एकत्र मिळाले व त्यांनी शुक्राचार्याला असा प्रश्न केला कीं, हे शुक्राचार्या ! आह्मां दैत्यांचे राज्य सर्व भूमंडळावर होऊन, सर्व इंद्रादि देव आह्मी जिंकावेत यासाठी काय केले पाहिजे ते आम्हांला सांगा.. तेव्हां शुक्राचार्य म्हणाले :-" जो एक लक्ष यज्ञ करील तो अमरावतीचा इंद्र होईल. या यज्ञासाठीं हत्ती, उंट, अनेक मनुष्यें व ऋषींची आवश्यकता असून शिवाय सर्व प्रकारची यज्ञसामग्रीहि पाहिजे. यथासांग हे यज्ञ तुह्मीं केल्यास, तुझी प्रबळ होऊन तुमचें राज्य अढळ होईल, आणि देव निर्बल होऊन त्या सर्वांचें तेज व पुण्य तुझांस प्राप्त होईल. - याप्रमाणे शुक्राचार्यांांनी सांगितल्या- वर राक्षसांनी यज्ञासाठी लागणारे सर्व साहित्य मिळविलें, व तरंगजा नदीचे काठीं भव्यमंडप घातला व ऋत्विज नेमून अश्वमेधाचे पद्धतीनें . सुमुहूतांवर त्यांनीं यज्ञास आरंभ केला; व वेदमंत्राच्या घोषांनी घृत, मेद वगैरे द्रव्यांच्या आहुती त्यांनी यज्ञकुंडांत टाकण्यास सुरुवात केली. हा प्रकार नारदास विदित होताच तो देवेंद्राकडे गेला व त्यानें पाताळांत राक्षसांनी आरंभिलेल्या यज्ञाची सर्व हकीकत देवेंद्राला सांगितली. ती हकीकत ऐकून देवेंद्र व सर्व देव भयभीत झाले व त्यानीं श्रीहरीची करुणा भाक- ण्यास आरंभ केला; हे संकटहरणा ! दुस्तरतरणा ! कमलाधवा ! माधवा ! नृसिंहरूप धारण करून तूं हिरण्यकशिपूचा जसा नाश केलास त्याचप्रमाणे या वेळीं, पाताळांत आमच्या नाशासाठी असुरांनी जो यज्ञ आरंभिला आहे त्याचा नाश कर. त्या असुरांनां वेदमंत्रांचा अधिकार नसतां वेदमंत्राचा घोष करून ते यज्ञ करीत आहेत, तर हे विश्वसंरक्षक नारायणा ! त्वरा करून या संकटाचें निवारण कर." या प्रमाणे देवांनी प्रार्थना केल्यावर भगवान् द्वारका- धीश गरुडावर बसून वेगानें वैकुंठाहून निघाले, व भक्तांच्या संरक्षणासाठी अम- रावतीस आले. आपल्या करुणारवाला हाक देऊन भगवान् आले असें पाहून सर्व देवांनां अत्यंत आनंद झाला व त्यांनी नारायणास वंदन केले. मग श्रीकृष्ण भगवान् देवांनां ह्मणाले; " देवहो ! त्या असुरांची पुण्यसामग्री यज्ञामुळें बरीच वाढली आहे, त्यांच्याबरोबर तुझीं युद्ध केल्यास तुम्हांस जय प्राप्त होणार नाहीं. यावेळी युक्तीनेंच कार्यभाग साधला पाहिजे. बळीचा नाश जसा युक्तीनेंच केला, त्याप्रमाणे या वेळी मी बौद्ध अवतार धारण करून त्या यज्ञाचा नाश करितों, तरी तुझी सर्व मजबरोबर पाताळांत चला. 29 ३ श्रावक - परमहंसांचा मेळा. १७१ विष्णूनें याप्रमाणे सर्वांना सांगितल्यावर तो आपणाबरोबर सर्व देवांनां घेऊन पाताळांत तरंगजेच्या कांठी आला. तेथे आल्यावर देव व विष्णु