पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● १ लें. ] अध्याय २ रा. 66 द्यावें, व व्रतबंध झाल्यावर आपण येऊन खुशाल घेऊन जावें. " वरुणानें राजाची ती विनंति त्या वेळीं मान्य केली व तो तेथून निघून गेला. नंतर वरुण आठ वर्षांनी म्हणजे रोहिदासाचा व्रतबंध झाल्यावर हरिश्चंद्र राजाकडे आला, व त्यानें पूर्वीप्रमाणे खरें सांगून पुत्राची मागणी केली; तेव्हां हरिश्चंद्र राजा मोठ्या विचारांत पडला व त्यावेळी त्यास मुलाचें संरक्षण कोणत्या युक्तीनें करावें तें सुचेना; मग त्यानें पूर्वीप्रमाणेच वरुणाची विनंति केली. तो वरुणाला म्हणाला; ' हे वरुणा, मुलाचा व्रतबंध झाला आहे, परंतु त्याला सर्व शस्त्रास्त्र विद्येत निपुण करण्याची माझी इच्छा आहे. सर्व युद्धविद्येत तो निष्णांत झाल्यावर आपण येऊन त्यास घेऊन जा. याप्रमाणें हरिश्चंद्रानें वरुणास विनंति केल्यावर ती वरुणानें मान्य केली व तो आपले स्थानीं निघून गेला. पुढें तो हरिश्चंद्र राजाचा पुत्र रोहिदास सर्व शस्त्रास्त्र विद्येत चांगला निपुण झाला. त्यावेळीं तो सोळा वर्षांचा होता. वरुणास हरिश्चंद्रानें अभिवचन दिल्या प्रमाणें तो, रोहिदास विद्येत पारंगत होण्याबरोबर दूतासह वरुण लोकांहून पृथ्वीवर आला, व त्याने आपले दूत रोहिदासाला आणण्यासाठी पाठवून दिले. त्यावेळी ते दूत रोहिदासाला आणण्यासाठी जात असतांनां वाटेंत गजशाळेत खेळत असलेला रोहिदास, त्या सर्वांनां आडवा झाला, व त्यानें आपल्या बाहुबलाने त्या सर्वांनां कैद करून टाकले. तें वर्तमान वरुणाला ल्यावर वरुण, हरिश्चंद्र राजावर अत्यंत संतप्त झाला व तो स्वतः साला आणण्यासाठी गजशाळेत आला; परंतु वरुण येण्याबरोबर रोहिदा- सानें आपलें धनुष्य आकर्ण ओढले व आपला भयंकर बाण वरुणावर रोखला. तो रोहिदास वरुणाला म्हणाला; ' हे वरुणा, जर तूं पुढे एक पाऊल टाकशील तर माझ्या या तीक्ष्ण बाणानें निष्कारण मरण पावशील." रोहिदासाची ती विलक्षण तेजस्विता पाहून वरुण जागच्या जागींच थबकला, व त्यास रोहिदासाला न्यायें की नेऊं नये, याचा विचार उत्पन्न झाला. सहज तर हा येत नाहीं; आणि बळेंच न्यावें तर हा आपणावर बाण रोखून उभा राहिला आहे. अशा स्थितीत यास नेणें दुरापास्त असून कदाचित् हा आपला यागहि नाहींसा करील, असे वाटून वरुण तेथून रोहिदासाला न घेतां निघून गेला. हे देवेंद्रा, याप्रमाणें हरिश्चंद्र राजानें वरुणाला आतां पुत्र देतों, मग पुत्र देतों; असे सांगून रोहिदास स्वतः आपले स्वसंरक्षण करील इतका काळ वरुणाशी गोड बोलून काढला व शेवटी त्यास वरील प्रमाणे रोहिदासाकडून स्पष्ट कळविलें. अशा रीतीनें हैं संकट हरिश्चंद्र राजानें टाळलें होतें. वरुणाला यासंबंधानें साहजिक फार राग आला होता, व तो हरिश्चंद्राला त्याबद्दल शिक्षा लावण्याची संधी शोधित होता. एके दिवशीं हरिश्चंद्र राजा नदींत स्नान करण्यासाठी आला आहे असे पाहून वरुण तेथें आला, व तो राजाला धरून खोल पाण्यांत नेऊन समज- रोहिदा- 66