पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक याप्र- 66 कोणी तरी दुष्टांनी कापून नेलें अशीच त्यावेळी सर्वांची समजूत झाली, आणि पुढें यज्ञाचें संरक्षण कोण करील, अशी ऋषींनां मोठी काळजी पडली मग ऋषींनीं श्रीहरीलाच जिवंत करण्याचा विचार केला व पूर्णाहुतीसाठी ठेवलेले 'घोड्याचे मस्तक त्यांनी श्रीहरीच्या शरीरावर वसवून त्याला जिवंत केलें. माणें श्रीहरि जिवंत झाल्यावर सर्वांना आनंद झाला, स्वर्गातून देवांनी प्रभूवर पुष्पवृष्टी केली. मग भगवान् ऋषीनां म्हणाला, ऋषीहो ! मी मनांत असा गर्व धरला की, या सर्व चराचराची घडामोड माझ्यामुळे होत आहे, तुमचा यज्ञ माझ्या शक्तीनें चालला आहे तेव्हां मीच सर्वांत धन्य आहे, असा मी अभिमानांत गर्क झाल्यामुळे धनुष्याची दोरी सहज तुटली व तिच्या झटक्या- बरोबर मस्तक कापून जाऊन आकाशांत गेले. यावरून गर्व अत्यंत नाशक आहे. हा प्रसाद माझ्या हातून घडल्यामुळे आदि पुरुषानें तो माझा गर्व हरण करण्याच्या हेतूनें माझा शिरच्छेद केला, असा या गर्वाचा परिणाम आहे. अभिमान हा यमाचा बाण असून ह्याच्या सारखा प्राणाचा नाश करणारा संपूर्ण विश्वांत दुसरा कोणीही नाही. गर्वरूप पाषाणाच्या नौकेनें जो भवसागर तरून जाण्याचें मनांत आणील तो निश्चयानें बुडून जाईल. असो, मला माझ्या गर्वाची शिक्षा चांगलीच मिळाली, तथापि तुझीं माझ्या उडून गेलेल्या मस्तकास वंद्य मानीत जा; कारण सर्व गात्रांत शिरकमल हैं प्रधान आहे. तें शिरकमल आकाशांत सूर्य झाले आहे. तेव्हां सूर्याला तुझीं नारायण स्वरूपच समजत जा. सूर्य हा मीच आहे तरी सूर्याचें जे भजन पूजन करितील, • त्याची जे उपासना करितील, त्यांनां त्यांचें इच्छित प्राप्त होईल. तसेंच त्यांनां आरोग्य प्राप्त होऊन सृष्टिप्रळयाची बाधा होणार नाहीं." याप्रमाणें विष्णूनी ऋषींनां सांगितल्यावर सर्व ऋषींनी सूर्यमंडळास नमस्कार करून सूर्याची पूजा व प्रार्थना केली. १७० कथाकल्पतरु. सूर्य जसा विष्णुरूप आहे, त्याप्रमाणें चंद्र हा ब्रह्मरूप आहे, आणि अंधार हा रुद्ररूप आहे. याप्रमाणे हयग्रीव अवतार झाला असून सूर्य मंडळाची उत्पत्तीहि विष्णुपासूनच झाली आहे. परंतु प्रथम सूर्य हा कश्यप ऋषींनी निर्माण केला. ती कथा अशी आहे की, कश्यप ऋषीनी एके वेळी आपली स्त्री अदिती ही कामोत्सुक आहे असे पाहून, आपले ऊर्ध्वरेत दक्षिण नेत्रांतून खाली पाडिलें, तो वीर्यगोळा सूर्य होय. कश्यपानें तो वीर्यगोळा अदितीसाठी पाडला म्हणून त्याचें नांव आदित्य असे ठेवून त्याला आकाशपंथानें जाण्यास सांगितले; परंतु तो वीर्यगोळा जरी तेजस्वी होता तरी त्याला किरण नव्हतें. विष्णूचे मस्तक त्या वीर्यगोळ्यांत मिळाल्यावर त्या सूर्याला सहस किरण उत्पन्न झाले. म्हणून त्याचा प्रकाश सर्वत्र जाऊं लागला. " ,