पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय १७ वा. 7, त्याप्रसंगी घेतले, तें मला आपण कृपा करून सांगावें. " त्यावेळी वैशंपायन ऋषि ती अवतारकथा सांगू लागले. ते ह्मणाले; "राजा ! ज्याप्रमाणे त्या भक्तवत्सल प्रभूनी नारसिंह अवतार घेतला होता, त्याचप्रमाणे हयग्रीव अवतार घेतला होता. ती कथा अशी आहे कीं, सृष्टि उत्पन्न झाल्यावर प्रथमारंभीच, अगस्तीनें कुरुक्षेत्र येथें एक यज्ञ करण्याचा विचार केला, त्याप्रमाणें त्यानें यज्ञाची सामुग्री तयार करून ऋषींनांही बोलाविलें, परंतु यज्ञाच्या संरक्षणासाठी कोणी नसल्यामुळे ऋषींला मोठा विचार पडला, तेव्हां अगस्ती ऋषी, भगवंताकडे गेले व त्याला वंदन करून ह्मणाले; " हे नारायणा ! सृष्टिनिर्मा- गासाठी आह्मी सर्व ऋषि कुरुक्षेत्र येथें यज्ञ करति आहों, तरी तो यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, व तेथे कोणी दुष्टानी येऊन आह्मांस त्रास देऊं नये ह्मणून तूं त्या यज्ञाचे संरक्षणासाठी चल. यज्ञमंडपाचें दरवाज्याजवळ तूं धनुष्य- बाण घेऊन उभा रहा, आणि सावधान चित्तानें आह्मां सर्वांचें रक्षण कर. अगस्ती ऋषींची ती विनंति श्रीहरीनें मान्य केली व तो हातांत धनुष्यवाण धारण करून यज्ञमंडपाचे दरवाजांत यज्ञ रक्षणासाठी उभा राहिला. याप्रमाणे ऋपींनी यज्ञ संरक्षणाची तजवीज केल्यानंतर सुमुहूर्त पाहून यज्ञास आरंभ केला. यज्ञकुंड प्रदीप्त झाल्यावर आहुती देण्यासाठी त्यांनी प्रथम घोडा निर्माण केला. त्या घोड्याचें मुख अगदी पूर्णाहुतीचे पाहिजे ह्मणून तें कापून ऋषींनी बाजूला ठेवलें, आणि बाकीच्या यवांच्या आहुती देण्यास त्यांनी मुरवात केली. अशा रीतीनें ऋषींचा यज्ञ चाललेला पाहून श्रीहरीला स्वतःविषयी मोठी धन्यता वाटली. तो आपल्या मनांत म्हणाला, या ऋषींचा यज्ञ आज मी येथे नसतो तर झाला नसता, या ऋषींचीं - तप व्रत यज्ञ - वगैरे कर्मों माझ्यावर अवलंबून आहेत, माझ्या कृपे- मुळेच यांच्या तीर्थयात्रा होतात, व ही चराचर सृष्टि केवळ माझ्याच प्रसादानें चालली आहे, सृष्टीची नियामकता केवळ माझ्याच इच्छेवर अवलंबून आहे, मजकडूनच सर्वांना खाण्यापिण्यास मिळत आहे, ही सृष्टी मीच निर्माण केली असून सर्व प्राणिमात्र मीच उत्पन्न करितों; यावरून या संपूर्ण विश्वांत मीच काय तो एक धन्य असा आहे. अशा प्रकारें अभिमानानें प्रेरित होऊन भगवान आपल्या मनांत गर्व मानू लागले तोंच त्यांच्या धनुष्याची दोरी एकाएकी तुटली व त्या दोरीचा झटका श्रीहरीच्या मानेला लागल्यामुळे त्यांची मान कापली गेली मस्तक धडापासून वेगळे होऊन आकाशांत उडून गेले. तेथे त्या मस्तकाचा सूर्य निर्माण झाला. शेवटी वेळीं अव ऋषी यज्ञ करीत असतां त्यांचे लक्ष नारायणाकडे गेलें तो नारायणाचे शरिरावर मस्तक नसून नारायण तसाच उभा आहे, असे सर्वांच्या लक्षांत आले. तो प्रकार पाहून सर्व आश्चर्यचकित होऊन अत्यंत दुःखी झाले. श्रीहरींचें मस्तक