पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ [ स्तबक तो स्त्री होईल. ” नंतर महादेव देवांनां हाणाले कीं, " मी तुमचें ह्नणणे ऐकले आहे त्या प्रमाणे तुह्मीहि माझें ह्मणणे कबूल करावें. तुझी सर्वानी वेरूळ येथें अशरूपानें रहावें. शंकरांचें तें ह्मणणें देवांनी कबूल केलें, आणि ते सर्व शिवासह तेथें अंशरूपानें राहिले. " कथाकल्पतरु. ८८ घेण्यास लोकांनां ● बालहत्या पापी वेरूळ येथें सर्व 66 'राजा जनमेजया! याप्रमाणे वेरूळ येथे घृष्णेश्वराची स्थापना होऊन सर्व देवांनींहि तेथें वास केल्यावर पातकापासून उद्धार करून ती एक मोठी सोय झाली. ब्रह्मघातकी, सुरापानी, मातृगमनी, करणारे, गोवध करणारे, गुरुद्रोही, वगैरे असंख्य येऊन शिवनदांत स्नान करून, घृष्णेश्वराचें दर्शन घेत त्यास त्यांच्या पातकांचा नाश करून, शिवगण त्यांनां विमानांत बसवून कैलासी घेऊन जात. असा क्रम सुरू झालेला पाहून यमाला अत्यंत वाईट वाटले. त्यानें आपले पाश, दंड, वगैरे साहित्य इंद्रापुढे ठेवून इंद्राला अशी विनंति केली की, देवेंद्रा ! हे तुझे पाश वगैरे सांभाळ; कारण आतां याची कांहींच अवश्यकता नाहीं. आज कित्येक दिवसांत मृत्युलोकींचा एकहि मनुष्य नरकांत आला नाहीं आणि जोपर्यंत वेरूळ येथील घृष्णेश्वर व शिवनंद आहे, तोपर्यंत कोणी येणारही नाहीं. '" तें यमाचें बोलणे ऐकून इंद्राला मोठे आश्चर्य वाटलें व असाच क्रम चालल्यास पापपुण्याचा विचार कांहींएक न राहतां संपूर्ण पृथ्वीवर घोटाळे होतील, असा विचार करून तो विष्णु वगैरे सर्व देवांसह शंकरांकडे आला व त्या देवांनी महादेवास झालेला प्रकार सांगून त्यांच्या अनुमतीनें शिवनंद तीर्थ माती टाकून बुजवून टाकलें, व घृष्णेश्वर लिंग किंचित झांकून टाकून देवांनीं आपला किंचित अंश तेथें ठेविला, व ते तेथून आपआपल्या स्थानीं निघून गेले. त्या शिवनंद तीर्थावर देवांनी टाकलेली ती माती साठ धनुष्य पर्यंत होती, ती येळराजाने पुढे काढून तें शिवनंद तीर्थ मनुष्यांनां स्नानासाठी मोकळें केले. त्या शिवनदाचें व घृष्णेश्वर लिंगाचें वर्णन करण्यास कोण समर्थ आहे ! या कथेच्या श्रवणानेंच सर्व पातकांचा उद्धार होतो मग दर्शनानें व स्नानानें किती पुण्याचा संचय होत असेल याची कल्पनाच करणे अशक्य आहे. अशा प्रकारची ही कथा आहे. अध्याय १७ वा. १ हयग्रीवावतारकथा व बौद्धावतारकथा. 66 राजा जनमेजय वैशंपायनाला ह्मणाला, “ ऋषि ! भगवंतानें अनेक अवतार धारण केले आहेत, त्यांतील हयग्रीव अवतार व बौद्ध अवतार हे, प्रभूनें कोण-