पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] अध्याय १६ वा १६७ पाताळांतून लिंग वर आलें, पण पार्वतीचा त्याला करस्पर्श झाल्याबरोवर ते पुन्हां पाताळांत गेलें; याप्रमाणे पार्वतीनें बारा वेळ प्रार्थना करून पाताळांतून वारा वेळ लिंग वर आणलें, पण त्याला हात लागल्यावरोवर तें खाली जात असे. • तेव्हां नारद ह्मणाला; " पार्वती ! तूं लिंगास करस्पर्श न करतां ते आपल्या दोन्ही जंघांच्या मध्यें दाबून धर. " त्याप्रमाणे मग पार्वतीने लिंगाची प्रार्थना करून लिंगास वर आणले व तें आल्याबरोबर जंघेंत दाबून धरिलें, तेव्हां तें स्थिर झालें, आणि अद्यापहि तें तसेंच आहे. खालची शाळुंका ती 'पार्वतीरूप असून शंकर हे पिंडीच्या स्वरूपानें आहेत. या लिंगाची त्रिकाळ पूजा केली असतां अनंत पुण्य मिळतें. लिंग बारा वेळ ज्या ज्या स्थानी आले त्या त्या स्थानीं ज्योतिर्लिंग झालेले आहे. तीं बारा स्थानें तुला सांगतों. सौरा- सोमनाथ, कर्नाटकांत मल्लिकार्जुन, गौतमीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर, हिमालयावर केदारेश्वर ( बद्रिकेदार ), सेतुबंध येथें रामेश्वर, काशीचा विश्वे- श्वर, उज्जनीस महांकाळ, वेरुळास घृष्णेश्वर, द्वारकेस नागेश, भीमेच्या उगम- स्थानीं भीमेश, देवपरळी येथे वैजनाथ आणि महाबलेश्वर येथे ओंकारेश्वर आहे. या बारा ज्योतिर्लिंगांपैकी वेरूळ येथील लिंगाचें माहात्म्य काशीच्या विश्वेश्वराच्या माहात्म्याच्या बरोबरीचें आहे. ५ वेरूळ माहात्म्य. येळगंगेचें माहात्म्य शंकरांनी एकदम वाढविल्यामुळे गोदावरी सर्व देवांना आपणाबरोबर घेऊन शकरांकडे आली, तेव्हां सर्व देव शंकरांना म्हणाले; “ हे कैलासपते ! जर ही येळगंगा समुद्राला जाऊन मिळेल तर या गौतमीला कोणीहि विचारणार नाहीं, तिची महती अगदी कमी होईल. " ही देवांची प्रार्थना ऐकून शंकर म्हणाले, “ मी या येळगंगेला समुद्राला मिळ शील असा वर दिलेला आहे, तर मी आपला शब्द परत घेणार नाहीं. इंद्र ह्मणाला; " महादेवा ! तुम्हीं तिला तसा वर दिला असेल तर तिची आणि समुद्राची भेट येथेंच करवूं म्हणजे तुमचा शब्दही खरा होईल आणि गोदाव- रीचें माहात्म्यहि कमी व्हावयाचें नाहीं." ती इंद्राची गोष्ट महादेवांनी कबूल केल्यावर देवांनी समुद्रास अंश रूपानें तेथें आणिले व त्या येळगंगेची व समु- द्राची भेट करविली. त्या समुद्राला तेथें शिवनद असे म्हणत असून त्यानें पांच कोंसपर्यंत येळगंगेला बांध घातला आहे, आणि नंतर पुढे उभयतां गौत- मीला मिळाल्या आहेत. त्या संगमस्थानाचें माहात्म्य कांही विलक्षण आहे. याच वेळी देवांनी महादेवाला अशी विनंति केली की, " देवा ! या काम्यकवनावरील शापहि काढून टाकावा, नाहीं तर अज्ञानी लोक सहज चुकून येथे येतील आणि बिचारे निष्कारण स्त्रिया होतील. " शंकरांनी ती देवांची विनंति मान्य केली. या वनांत कोणीही आले. तरी हरकत नाही, पण कावळा आल्यास तेह्मणाले, 66 "