पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ [ स्तबक आहेत. त्यांनां पाहून सर्वोनां मोहिनी पडते. मला वाटतें, त्या स्त्रियांच्या रूपानें मदनच भूतलावर अवतरला आहे. त्या स्त्रिया तारुण्याच्या भरांत आहेत, परंतु त्यांचे पति तप करित असल्यामुळे त्यांनां त्या तारुण्याचा कांही उपयोग नाहीं. त्या स्त्रिया प्रातःकाळ झाल्याबरोबर आपआपल्या पतीला अन्न नेऊन देतात व आपआपल्या आश्रमांत परत येतात. हा एक चमत्कार मी पृथ्वीवर पाहिला, तो आपणास कथन केला. देवा ! त्या स्त्रियांचें सत्व हरण करण्याचा प्रयत्न करून पहावा अशी माझी इच्छा आहे, तर तेवढी या सेवकाची इच्छा पुरी करावी. " नारदानें असे सांगितल्यावर शंकरांनी आपली सर्व भूषणें काढून ठेवून आपल्या सर्वां- गाला विभूति चर्चून नग्न झाले व पृथ्वीवर त्या ब्राह्मण स्त्रियांच्या आश्रमांजवळ आले. शंकर भगवान आपले डोळे मिटून व प्रत्येक आश्रमासमोर उभे राहून भिक्षा घाला असें ह्मणूं लागले. त्या ऋषींच्या स्त्रियांनी प्रभातकाळी, तो नागवा गोसावी आलेला पाहून त्यांना फार भीति वाटली व तो जाईपर्यंत त्या दारें लावून घेऊन आंत बसल्या. याप्रमाणे मध्यान्हापर्यंत शंकर त्या आश्रमाजवळ राहून नंतर कैलासपर्वती निघून गेले. त्यानंतर त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया घरांतून अन्न घेऊन निघाल्या, व त्यांनीं तें आपआपल्या पतीला आणून दिले. त्या वेळीं ते सर्व ब्राह्मण अन्न आणण्यास उशीर लागला व त्यामुळे देवतार्चन वगैरे राहिलें, हाणून आपआपल्या स्त्रियांवर रागावले. तेव्हां त्या स्त्रिया ह्मणाल्या, - आज सकाळी उजाडलें नाहीं तोंच कोणी एक नग्न, कपटी, दुष्ट, असा गो- सावी आला; तो आश्रमाजवळ मध्यान्हकाळपर्यंत होता, त्यामुळे अन्न आणण्यास उशीर लागला. १ कथाकल्पतरु. ४ ज्योतिर्लिंगाचें गमनागमन. स्त्रियांचें तें भाषण ऐकून सर्व ऋषि त्या गोसाव्यावर अत्यंत संतप्त होऊन त्यांनी त्याला असा शाप दिला की, “ ज्याने आमच्या आश्रमाजवळ नग्न येऊन आमच्या स्त्रियांनां त्रास दिला, त्याचें लिंग गळून पडेल, ऋषींनी अशा प्रकारें शाप दिल्यावर शंकरांचे लिंग गळून पडलें, व तें पाताळांत गेलें. ऋषिशापानें आपले लिंग नाहींसें होऊन आपण पुरुषत्वाला मुकलों, याबद्दल शंकरांस फार लज्जा उत्पन्न झाली, व ते तपश्चर्या करण्यासाठी अरण्यांत निघून गेले. मग पार्वती नारदाला ह्मणाली; नारदा ! हा सर्व घोंटाळा तुझ्यामुळे झाला आहे. तर लिंग परत आणण्याची कांहीं तरी तजवीज कर. " तेव्हां नारद ह्मणाला; हे देवी पार्वती ! तूं पृथ्वीवर जाऊन ऋषींनांच यासंबंधानें काय करावयाचें ते विचार. " त्या प्रमाणे पार्वती व नारद ऋषींकडे आले व त्यांनी ऋषींना सर्व हकिकत सांगून, लिंग परत कसें मिळेल तें विचारलें. लिंगाची प्रार्थना केल्यास लिंग परत येईल असे ऋषींनी सांगितलें. पार्वती त्याप्रमाणे लिंगाची प्रार्थना करीत बसली. प्रार्थना पुरी झाल्यावर मग