पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रँ. ] अध्याय १६ वा. " 39 वरदा' असें तुझ्या दर्शनासाठी सर्व देव आले आहेत, तर त्यांच्या भेटीसाठी विंध्याद्रीवर चल. " गोदावरीनें असें ह्मणतांच महादेव पार्वतीसह विंध्याद्रीवर आले तेव्हां पार्वती ह्मणाली; " देवा ! मला फार तहान लागली आहे, तर उत्तम पाणी शोधून आणा. मग महादेवांनी आपला त्रिशूळ भूमीत रोवून पाताळांतले अमृतजल वर आणले. त्या पाण्याचे वंदन कलें व तं पार्वतीला पिण्यासाठी दिलें. पार्वतीची तृषा शांत झाल्यावर महादेव पार्वतीला ह्मणाले; पार्वती ! या तीर्थाचे ठिकाणी जो कोणी स्नान करील तो कधी यमाचें तोंडसुद्धां पहाणार नाहीं. जरी महा पातकी असला तरी तो, ह्याचें वंदन केल्यानें पातकापासून मुक्त होऊन कैलासी जाईल. त्या तीर्थाचें नांव असून त्याचा विस्तार पांच कोस आहे. त्या तीथीचे कांठीं पार्वतीने हातावर कुंकूं घेतलें, व तें शंकरांचे मस्तकास लावण्यासाठी हातावर चोळू लागली, तो त्या कुंकुमाची गोळी झाली. आणि ती गोळी पार्वतीने हातावर घेतांच त्या गोळीचें ज्योतिर्लिंग तयार झालें. तेव्हां महादेव पार्वतीला ह्मणाले; "माझ्या अंतःकरणांत जो ईश्वर आहे, त्याचा दृश्य आकार हें लिंग आहे. " मग महादेवांनी तें लिंग आपल्या हातावर घेऊन त्यास वंदन केलें, व ते हालणार नाहीं असे भूमोवर ठेविलें. त्यांनी त्या लिंगाला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. इतक्यांत सर्व देवही शंकरांकडे आले, त्यांनी ते रक्तलिंग पाहून शिवाचेंच अनुकरण करून त्या लिंगाला वंदन केले. सर्व विष्णु आदि देवांनीं त्या तीर्थात स्नान करून भक्तीनें त्या लिंगाची पूजा केली, व त्यास नमस्कार केला. जगत्पित्या शंकरानें स्थापन केलेलें तें लिंग, ह्मणून सर्वांनी अनन्यभावानें त्या लिंगावर अक्षता टाकिल्या, पार्वतीने कुंकु हातावर घांसून त्याचें लिंग केलें हाणून शंकरांनी त्याचे नांव घृष्णेश्वर असे ठेवलें. या ज्योतिर्लिंगाचें दर्शन ज्याला होईल, त्याला स्वर्गीचें अमृत प्राशन करण्यास मिळेल व तो कितीही पातकी असला, तरी तो नरकयातना चुकवून पुनीत होईल असा त्या स्थानास शंकरांनी वर दिला. ३ ब्राह्मणांचा शिवास शाप. 66 घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची हकीकत ऐकल्यावर जनमेजयाला द्वादश जोति- लिंगांच्या स्थापनेची हकिकत ऐकण्याची इच्छा झाली त्यांनी वैशंपायन ऋपीला ती कथा सांगण्याविषयीं विनंती केली. तेव्हां वैशंपायन ऋषी ह्मणाले; राजा जनमेजया ! एकदां नारद कैलासी गेले व त्यांनी भक्तिभावाने महादेवांचे चरणावर मस्तक ठेवलें. तेव्हां महादेवांनी त्याला उठवून प्रेमानें आपल्या आसनावर बसविलें. नंतर महादेव ह्मणाले; नारदा ! कोटें कांहीं नवल- विशेष पाहण्यांत आले असल्यास ते मला सांग." तेव्हां नारद ह्मणाला; " देवा ! भागीरथीचे कांठीं एक सहस्र ब्राह्मण ब्रह्मचर्य धारण करून तप करीत बसले आहेत. त्यांच्या स्त्रिया तरुण असून त्रिभुवनांत सुंदर अशा 66