पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ कथाकल्पतरु. [ स्तबक सांगितले. सुयुम्नानें पुष्कळ दिवस शंकरांची सेवा केल्यावर शंकर त्याला प्रसन्न झाले. तेव्हां तो ह्मणाला; " हे कैलासपते ! मला तुझ्या कृपेनें पुन्हां पुरुषत्व मिळावे " तें ऐकून महादेव ह्मणाले; " मी वनाला दिलेला शाप कधीहि कोणाला टाळतां यावयाचा नाहीं, तथापि तुझ्या भक्तीमुळे मी फार प्रसन्न झालों आहे, ह्मणून मी तुला असा वर देतों कीं, तूं एक महिनाभर पुरुष व एक महिनाभर स्त्री राहशील :" याप्रमाणे शिवाचा वर मिळाल्यावर तो मुद्युम्न एक महिनाभर पुरुष होऊन आपला राज्यकारभार पाही, व एक महिनाभर स्त्री झाल्यावर बुधाच्या घरचीं गृहकृत्यें करी. याप्रमाणें तो सुद्युम्न आपले कष्टकारक आयुष्य कंठीत असतां त्याला स्त्रियेच्या अवस्थेत बुधापासून गर्त, उत्कल आणि मळ असे दुसरे सोमवंशी तीन पुत्र झाले. आणि स्वतः पुरुष असतां त्याला त्याच्या स्त्रियेच्या ठिकाणी इक्ष्वाकु नांवाचा सूर्यवंशी पुत्र झाला. सुद्युम्नानें आपले पुत्र जागते झाल्यावर सोमवंशी मुलांचे स्वाधीन पैठणचें राज्य केले व सूर्यवंशी इक्ष्वाकृचे स्वाधीन अयोध्येचें राज्य करून स्वतः त्या चमत्कारिक स्त्रीपुरुषावस्थेला कंटाळून त्यानें अरण्यांत जाऊन पुढील आयुष्य तपश्चर्येत घालविलें. व तो मुद्युम्न स्त्रियेन्या अवस्थेत असतांच परलोकवासी झाला. २ येळगंगेची कथा. त्या सुद्युम्नानें शंकरांची तपश्चर्या अत्यंत भक्तिभावानें केली असल्यामुळे अंती त्याला महादेव प्रसन्न झाले, व त्या येळा नावाच्या स्त्रियेचें नाव भूमीवर चिरकाल रहावें ह्मणून तेथें येळा नावाची नदी निर्माण केली, आणि तिला असा आशीर्वाद दिला कीं, तूं महानदी होऊन समुद्राला मिळशील. संपूर्ण भूमंडळावरील लोकांना तूं वंद्य होऊन तुझ्या स्नानानें महा पातक्यांचा देखील उद्धार होईल. असा त्या येळगंगेला आशीर्वाद मिळाल्यावर नारद घाईघाईनें गोदावरीकडे आला व तिला येळगंगेची माहिती सांगून ह्मणाली; " गोदावरी ! आतां पृथ्वीवरील लोक तुला न विचारतां, सर्व येळगंगेकडे जाऊन पावन होतील. तुला जर तुझ्या नावाची कांहीं चाड असेल तर तूं ती येळगंगा समुद्राला मिळाली नाहीं तोंच शंकराला जाऊन भेट, व कांहीं तरी खटपट कर. नाहीं तर ती येळगंगा पश्चिमेच्या वाटेनें धांबू लागेल व तिला उत्तरेकडील सर्व नद्या येऊन मिळतील, तिला सगळे वंद्य मानतील आणि पृथ्वीवरील तेंच एक पुण्यक्षेत्र होईल." नारदाचें तें भाषण ऐकून गोदावरीने सर्व देवांची प्रार्थना केली. तेव्हां ब्रह्मा, इंद्र वगैरे सर्व देव येऊन विंध्याद्रीवर राहिले. ते गोदावरीला ह्मणाले; " गोदे ! आह्मीं त्या काम्यकवनांत शंक राकडे त्याची विनंति करावयाला गेलो तर सर्वजण स्त्रिया होऊं, ह्मणून गोदावरी तूं त्यांच्याकडे जाऊन त्यांनां इकडे घेऊन ये." त्याप्रमाणें काम्यकवनांत गेली व शंकराला वंदन करून ह्मणाली; "देवाधिदेवा कैलासपते !