पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रॅ. ] अध्याय १६ वा. . झाली व तिनें घाईघाईनें वस्त्र परिधान केलें दर्शन करून ऋषि गेल्यावर पार्वती महादेवाला ह्मणाली; " मी आजपासून नग्न अशी तुमच्या अंकावर कर्धीहि बसावयाची नाही, कारण तुझांकडे कोण पुरुष केव्हां येईल याचा कांहीं नियम नाहीं. " तेव्हां शंकर ह्मणाले, "या काम्यक वनांत असतां तूं मज- बरोबर नग्नावस्थेत खुशाल असत जा, मी या वनाला आजपासून असा शाप देऊन ठेवतों कीं, या अरण्यांत जो कोणी पुरुष येईल तो स्त्री होईल. प्रमाणे शंकरानी त्या काम्यकवनाला शाप दिल्यावर त्या अरण्यांत कोणीहि जात नसे, परंतु एके दिवशीं सुयुम्न नावाचा राजा दुर्भाग्यवशात शिकारीच्या नादी लागून त्या अरण्यांत गेला, व गेल्याबरोबर स्त्री झाला. 99 यः पुत्र सुयुम्नाची कथा अशी आहे कीं, सूर्यपुत्र श्राद्धदेवाला पुष्कळ दिवसपर्यंत होत नव्हता, ह्मणून त्यानें पुत्रप्राप्तीकरितां मोठा यज्ञ केला, परंतु पूर्णाहुतीचे वेळीं ऋषींनीं पुत्राचा आशीरवाद न देतां ' मुलगी होईल' असा आशीरवाद दिला. त्याप्रमाणे त्या श्राद्धदेव राजाला कांही काळ गेल्यानंतर येळा नांवाची एक सुंदर मुलगी झाली. त्या कन्येकडून पितृऋणाची फेड कांहीं होणार नसल्यामुळे श्राद्धदेव अत्यंत दुःखी असे, सूर्यवंशाच्या उद्धारासाठी पुत्र व्हावा ह्मणून त्यानें ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतलें. ब्रह्मदेवानें आणखी कांहीं देवांचें साह्य घेऊन श्राद्धदेवाला जी मुलगी झाली होती तिलाच पुरुषाचे अवयव प्राप्त करून दिले. श्राद्धदेवानें त्याचें नाव सुयुम्न असें ठेविलें; तो मुझुम्न तरुण झाल्यावर एके दिवशीं माहित नसल्यामुळे शंकरानी शापिलेल्या काम्यकवनांत शिकारीसाठी गेला असतां एककी पुरुषाचा स्त्री झाला, व त्याच्या घोड्याची घोडी झाली. त्या वेळी तो अत्यंत लजित झाला. व त्यामुळे त्याला त्या अरण्याचे बाहेर पडण्याचें धैर्य होईना. मग तसाच लाजत लाजत कोणाचे दृष्टीस न पडतां तो एका सरोवराचे कांठी झालेल्या विपरीत प्रकाराबद्दल दुःख करीत बसला. इतक्यांत, बुध त्या अरण्यांत शिकार करित होता, तो तहानेनें व्याकूळ झाल्यामुळे त्याच सरोवरावर पाणी पिण्यासाठी आला. पाणी प्याल्यावर त्याची दृष्टी त्या सुंदर स्त्रीकडे गेली व तो कामातुर होऊन त्यानें त्या स्त्रियेला आपणास वरण्याविषयीं विनंति केली. मुद्युम्नानें निरुपाय जाणून बुधाची ती मागणी मान्य केली व त्याच्या गळ्यांत माळ घालून ती बुधाची अर्धागी झाली. त्या सुयुम्नास पुढें बुधा- पासून पुरूरवा या नांवाचा पुत्र झाला. इकडे सुझुम्न बरेच दिवस घरी न आल्यामुळे श्राद्धदेव मोठ्या काळजींत पडला व तो त्याचा फार बारकाईनें शोध करूं लागला. कांही दिवसांनीं वसिष्ठांनी सुद्युम्नाची ती हकीकत श्राद्धदेवाला सांगितली. तें ऐकून श्राद्धदेव फार हताश झाला. मग वसिष्ठानें सुझुम्नास त्या अवस्थेतून सुटण्यासाठी शंकराचें तप करण्यास