पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक संकट आलें होतें; व त्यानें आपल्या संकटाचें कोणत्या युक्तीनें परिमार्जन केलें; हें ऐकण्याची मला इच्छा झाली आहे, तर ती कथा आपण मला कृपा करून सांगावी. १ ८ कथाकल्पतरू. ३ हरिश्चंद्र राजानें केलेले पुत्राचें संरक्षण. 66 66 देवेंद्रानें बृहस्पतीला अशी विनंति केल्यावर ते त्यास ती कथा सांगू लागले. ते झणाले, हें देवेंद्रा, सूर्यवंशीं हरिश्चंद्र राजाला पुष्कळ दिवसपर्यंत संतति न झाल्यामुळे तो अत्यंत चिंताक्रांत झाला होता. पुत्र प्राप्तीसाठीं कांहीं तरी ईश्वर भक्ति केली पाहिजे असे त्यास वाटू लागले व तो त्याचा विचार, त्याची स्त्री जी तारामति तिलाहि पसंत पडला. मग त्या दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी कित्येक वर्षेपर्यंत वरूण देवतेची सेवा व सुश्रुपा केली. त्या दोघांची एकनिष्ठ भक्ति पाहूम वरुण त्यानां प्रसन्न झाला, व इच्छित वर मागा ह्मणून ह्मणाला. तेव्हां हरिश्चंद्रराजा वरूणाला ह्मणाला; हे वरूण देवा, मला एक पुत्र व्हावा, एवढेच माझें मागणें आहे. " हें इरिश्चंद्र राजाचें मागणें ऐकून वरूण ह्मणाला; हरिश्चंद्रा, माझ्या कृपेनें तुला लवकरच एक मुलक्षणी व सर्वांग सुंदर पुत्र होईल, परंतु तो तूं मी मागेन तेव्हां मला परत दिला पाहिजे. " तेव्हां हरिश्चंद्र ह्मणाला, " हे वरूणा, तूं मागशील तेव्हां मी पुत्र परत देईन, परंतु मला पुत्र होऊन मी पितृऋणांतून मुक्त झाल्यावांचून तूं पुत्र परत मागूं नयेस एवढीच तुला माझी विनंति आहे. " वरूणानें ती हरिश्चंद्र राजाची विनंति मान्य केली व तो राजाला वरप्रदान देऊन स्वस्थानीं निघून गेला. पुढे कांहीं दिवसांनीं तारा- मति प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. हरिश्चंद्र राजाला त्यावेळी फार आनंद झाला व त्यानें मोठा पुत्रोत्सव करून मुलाचें नांव रोहिदास असें ठेविलें. तो हरिश्चंद्र राजा पुत्रप्राप्तीच्या आनंदांत मन झालेला असतांनां बारा दिवसांनी त्याच्याकडे एकाएकी वरुण आला व तो राजाजवळ पुत्र परत मागूं लागला. तेव्हां हरिश्चंद्र वरुणाची करुणा भाकून म्हणाला; “ हे वरुणा, मुलगा फारच लहान आहे, त्याला दांत निघाल्यावर तूं ये, व मुलगा घेऊन जा." वरुणानें राजाची ती विनंति मान्य केली व बरुण त्या वेळी तेथून निघून गेला. नंतर तो सोळा महिन्यांनीं हरिश्चंद्राकडे आला, व मुलगा परत मागूं लागला. तो हरिश्चंद्र राजाला म्हणाला; 66 हे राजा हरिश्चंद्रा, तूं सांगितल्या प्रमाणे मी मुलाला दांत निघाल्यावर आलो आहे, तर मला मुलगा परत दे. मी नरयागकरण्याचें योजिले आहे. त्या नरयागासाठी मला तुझ्या पुत्राची अत्यंत आवश्यकता आहे. " हें वरुणाचें भाषण ऐकून हरिश्चंद्रराजा अत्यंत चिंतातूर झाला. तो पुन्हां वरुणाची करुणा भाकून म्हणाला; हे वरुण देवा, जो पर्यंत मुलाचा व्रतबंध झाला नाहीं, तो पर्यंत तो शूद्र आहे, त्याचा नरयागाला कांहींहि उप- योग व्हावयाचा नाहीं, तर त्या मुलाचा व्रतबंध होईपर्यंत त्याला मजजवळ राहूं ✓ 66