पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें ] अध्याय १५ वा. १ · त्रिशूळ, डमरू, नंदी, रुंडमाळा, वासुकीहार, अलका, कुबेर, व्याघ्रांबर, कमंडलू, गजचर्म, भिक्षेची झोळी, भस्म, वगैरे सर्व हरण केलें; शेवटीं महादे- वांनी रागावून कमरेची लंगोटी पणांत लावली, पण तीहि पार्वतीने जिंकली. तेव्हां शंकर पार्वतीला ह्मणाले; "पार्वती ! तूं आणखी एक वेळ मजबरोबर खेळ, आणि त्या डावांत जर तूं मला जिंकशीलं तर मी तुला जिंकलेले सर्व देईन. " मग पार्वती ह्मणाली; “देवा ! आतां आपणाजवळ पणांत लावण्या- साठीं कांहींहि नाहीं, ह्मणून मी आपणाबरोबर खेळत नाहीं. " तेव्हां महादेव रागावले व ह्मणाले; " तूं जर खेळत नाहींस तर मी तुला तूं जिंकलेले कांहींहि देत नाहीं. " तेव्हां पार्वतीसहि राग आला व तिनें आपल्या सख्यांना बोलावून महादेवांजवळच्या एकेक वस्तु काढून घेतल्या. शेवटी महादेवांनी क्रुद्ध होऊन लंगोटीहि फेंकून दिली व कैलास पर्वत सोडून देऊन दुसरीकडे निघून गेले. ती त्या वेळची गंमत पाहून नारद आनंदाने नाचूं लागला, पण कांहीं वेळ गेल्यानंतर पार्वतीला थट्टेचा परिणाम भलताच झाला, याबद्दल फार पश्चाताप वाटू लागला. मग ती नारदाला ह्मणाली; "नारदा ! चल आपण महादेवांनां समजावून आणूं. • तेव्हां नारद ह्मणाला, “ पार्वती माते ! तूं अशीच शंकरांकडे गेल्यास ते अधिक रागावतील, ह्मणून तूं आतां भिल्लिणीचा वेष धारण करून महादेवाकडे जा, ते हल्लीं गोदावरीच्या उत्तर तीरावर सह्याद्रीच्या पाठारीं महेश्वर नांवाच्या क्षेत्राजवळ जें एक अरण्य आहे त्या अरण्यांत तपश्चर्या करित बसले आहेत. " मग पार्वतीने नारदानें सांगितल्या प्रमाणे भिल्लिणीचा वेष धारण केला. हातांत धनुष्य व बाण घेतला, मोराचीं पिसें मस्तकास व कंबरेला बांधली, गुंजा वगैरे मण्यांचे हार् तयार करून ते गळ्यांत घातले, कानावर फुलें ठेविलीं, सुंदर केस गुंफून त्यांत केवड्यांची पानें खोविली, उत्तम वस्त्र परिधान केलें व पायांत नृपुरें बांधून ती नाचत नाचत व सुस्वर गाणी गात गात शंकर ज्या वनांत बसले होते, त्या वनांत आली. वसंत ऋतूस नुकताच आरंभ झाल्यामुळे त्या वनालाहि अधिक शोभा आली होती; नाना प्रकारच्या फुलझाडांना फुलांचा बहार आला होता; आंबे, फणस, बकुळ, द्राक्ष, डाळींच वगैरे वृक्ष फलभारानीं लीन झाले होते. मोर टाहो फोडीत होते, कोकीळा सुस्वर गात होत्या. अशा वेळी भिल्लोण महादेवापुढे जाऊन मल्हार रागांत गाऊन नाचू लागली. तो सुस्वर स्वर व तो मनोहर नूपुरध्वनि ऐकुन महादेवांच्या चित्तवृत्तींत चांचल्य उत्पन्न झालें, व ते डोळे उघडून त्या मिलिणीकडे पाहू लागले, ती संधी साधून भिल्लीण अधिक हावभाव करूं लागली. १६१ 37 त्या भिलिणीचे नेत्रकटाक्ष, हावभाव, नृत्य व ते गाणें वगैरे पाहून महा- देवांस स्थिर बसवेना, ते भिलिणीकडे पाहून म्हणाले; टक लावून “ सुंदरी ! अम्मळ स्थिर उभी रहा, माझ्याशी दोन शब्द बोल तूं कोण 3 ११